वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलसचिव श्री.
का. वि. पागीरे दि. 3१ मे रोजी सेवानिवृत्त झाले, त्यानिमित्य विद्यापीठाच्या वतीने
निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजीत केला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
विद्यापीठाचे कुलगूरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु होते, तर व्यासपीठावर शिक्षण संचालक
डॉ. विश्वास शिंदे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद
वासकर, नियंत्रक श्री. अप्पासाहेब चाटे व विद्यापीठ अभियंता श्री. अब्दुल रहिम आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात कुलगूरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु
म्हणाले की, श्री. का. वि. पागीरे हे एक अष्टपैलु व्यक्तीमत्व असुन सर्वांना
सोबत घेऊन काम करणारा व्यक्ती अशी त्यांची प्रतिमा आहे. त्यांच्या सकारात्मक
दृष्टिकोनामुळे विद्यापीठातील त्यांच्या दिड वर्षाच्या सेवाकाळात विद्यापीठ
अडजणीच्या प्रसंगी कुलसचिव या नात्याने त्यांनी योग्य निर्णय घेतले. विद्यापीठातील
रिक्त पदे, जमिनीवरील अतिक्रमण, प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न, प्रशासकीय प्रश्न आदी
अनेक समस्या विद्यापीठासमोर असुन विद्यापीठास सक्षम कुलसचिवांची निश्चितच उणीव
भासेल, अशी प्रतिक्रीया त्यांनी व्यक्त केली.
सत्काराला उत्तर देतांना कुलसचिव श्री. का. वि.
पागीरे म्हणाले की, शासकीय सेवेत कार्य करतांना समाजाला आपण काय देतो हे महत्वाचे
असुन सकारात्मक दृष्टिकोन व कठोर परिश्रमाच्या आधारे नौकरी कालावधीत चांगले योगदान
देता आले. विद्यापीठाच्या सेवेत असतांना विद्यापीठातील विविध पदांची बिंदुनामावली
व सेवा जेष्ठता यादीचे अद्यावतीकरण हे महत्वाचे कार्य करू शकलो.
श्री. का. वि. पागिरे यांनी अहमदनगर येथे विस्तार
अधिकारी या पदावर शासकीय सेवेची सुरूवात करून गट विकास अधिकारी, तालुका कृषि
अधिकारी, तंत्र अधिकारी, कृषि उपसंचालक, उपविभगीय कृषि अधिकारी आदी या विविध पदावर
कार्य केले. शासकीय सेवेत त्यांनी ३५ वर्षे कार्य केले असुन पुणे येथील कृषि
आयुक्तालयात कार्यरत असतांना राज्यस्तरीय कृषि क्षेत्राची तांत्रिक माहिती
संकलीत करण्याच्या कार्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक कुलसचिव श्री. व्ही
एन नागुला यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. आशा आर्या यांनी केले तर आभार
प्रदर्शन सहायक नियंत्रक श्री जी यु उबाळे यांनी केले. याप्रसंगी विविध
महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य, प्राध्यापकवृंद व कर्मचारीवर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.