Monday, March 2, 2015

विसावा दीक्षांत समारंभानिमित्‍त आयोजित पत्रकार परिषद संपन्‍न


परभणी: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा विसावा दीक्षान्‍त समारंभ दि ५ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता विद्यापीठाच्‍या मुख्‍य प्रांगणात संपन्‍न होणार असुन कार्यक्रमाचे अध्‍यक्षस्‍थान महाराष्‍ट्र राज्‍याचे राज्‍यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती महामहिम श्री. चेन्‍नमनेनी विद्यासागर राव भूषविणार असुन महाराष्‍ट्र राज्‍याचे कृषि व फलोत्‍पादन, पशुसंवर्धन, दुग्‍धविकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री तथा विद्यापीठाचे प्रति कुलपती मा. ना. श्री. एकनाथराव खडसे व परिवहन मंत्री मा. ना. श्री. दिवाकरराव रावते यांची प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्‍न होणार आहे. याप्रसंगी दीक्षान्‍त भाषण अणुउर्जा आयोगाचे माजी अध्‍यक्ष तथा राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे अध्‍यक्ष मा. डॉ. अनिल काकोडकर करणार असुन मराठवाडयाच्‍या कृषी व जलसंधारण  क्षेत्रातील योगदानाबाबत मराठवाडा शेती सहाय्य मंडळाचे विश्‍वस्‍त मा. विजयअण्‍णा बोराडे यांना कृषि रत्‍नया मानद उपाधीने सन्‍मानित करण्‍यात येणार आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी विसावा दीक्षान्‍त समारंभानिमित्‍त दि २ फेब्रुवारी रोजी आयोजीत पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ. दिनकर जाधव, जिल्‍हा माहिती अधिकारी श्री केशव करंदीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
सदरिल दीक्षांत समारंभात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत विविध विद्याशाखेतील एकूण ३८१७ स्‍नातकांना विविध पदवी, पदव्‍युत्तर व आचार्य (पीएच.डी.) पदवीने माननीय कुलपती महोदयांव्‍दारे अनुग्रहीत करण्‍यात येणार असुन उत्‍कृष्‍ट शिक्षक पारितोषिक आणि राधाकिशन शांती मल्‍होत्रा पारितोषिक देण्‍यात येणार असुन कार्यकारी परिषदेचे सन्‍माननीय सदस्‍यांसह अनेक मान्‍यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनकर जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विभाग प्रमुख डॉ राकेश आहिरे यांनी केले. सदरिल पत्रकार परिषदेस विविध माध्‍यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. पत्रकार परिषद यशस्‍वतीतेसाठी डॉ पी आर देशमुख, प्रा. पी एस चव्‍हाण, श्री चंद्रशेखर नखाते, श्री जोशी आदींनी परिश्रम घेतले. सदरिल दीक्षान्‍त समारंभात पुढील प्रमाणे विद्यार्थ्‍यांना विविध पदवीने अनुग्रहीत करण्‍यात येणार असल्‍याचे सांगण्‍यात आले.

अ. क्र.
अभ्‍यासक्रम
एकुण पात्र स्‍नातक
आचार्य (पीएच.डी.) पदवी
पीएच.डी (कृषि)
२६
पीएच.डी (गृहविज्ञान)
०१
पीएच.डी (कृषि तंत्रज्ञान)
०१

एकुण ()
२८
पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रम
एम.एस्‍सी (कृषि)
३९७
एम.एस्‍सी (गृहविज्ञान)
१५
एम. टेक (कृषि अभियांत्रीकी)
२५
एम. टेक (अन्‍नतंत्रज्ञान)
२७
एम.एस्‍्सी (उद्यानविद्या)
५०
एम. बी.ए. (कृषि)
६२

एकुण ()
५७६
पदवी अभ्‍यासक्रम:  
बी.एस्‍सी (कृषि)
१९२१
बी.एस्‍सी (उद्यानविद्या)
६०
बी.एससी. (गृहविज्ञान)
३१
बी. टेक (कृषि अभियांत्रीकी)
२१४
बी. टेक (अन्‍नंतत्रज्ञान)
५८४
बी.एस्‍सी (कृषि जैवतंत्रज्ञान)
३६१
बी.एस्‍सी (कृषि व्‍यवसाय व्‍यवस्‍थापन)
४२

एकुण बी. टेक ()
३२१३

एकूण आचार्य, पदव्‍यूत्‍तर व पदवी
(++)
३८१७