रासेयोच्या शिबीराच्या समारोपात मार्गदर्शन करतांना प्राचार्य प्रा पी एन सत्वधर, प्रा दिलीप मोर, प्रा एच एम सय्यद, कार्यक्रमाधिकारी प्रा प्रविण घाटगे आदी |
वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठातंर्गत असलेल्या अन्नतंत्र महाविद्यालयाच्या राष्ट्रीय
सेवा योजने अंतर्गत नवागड (उखळद) येथे शिबीराचे
दिनांक १३ ते १९ मार्च दरम्यान आयोजीत करण्यात आले होते. शिबीराचा समारोपीय
कार्यक्रम दि १९ मार्च रोजी झाला संपन्न झाला. या समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. पी. एन. सत्वधर हे होते तर डॉ दिपक महेंद्रकर, डॉ
कनकदंडे, प्रा. एच. एम. सय्यद, प्रा. दिलीप मोरे, प्रा. हेमंत देशपांडे आदींची प्रमुख
उपस्थिती होती.
या सात दिवशीय
शिबीरांतर्गत कृषि व अन्न प्रकिया उद्योगासंबंधी ग्रामीण महिला व युवकांना
मार्गदर्शन करण्यात आले. आरोग्यासाठी पोषकअन्नाचे महत्व, स्त्री शिक्षण, स्त्री-भ्रुणहत्या
प्रतिबंध याविषयावर मार्गदर्शन करण्यात आले. शिबीरात ३२ स्वयंसेवकांनी रक्तदान केले
तसेच गांवात स्वच्छता मोहिमे राबविण्यात येऊन योगा व प्राणयाम याचे प्रात्यक्षिके
डॉ दिपक महेंद्रकर यांनी दाखवुन महत्व सांगितले. व्यसनमुक्तीवर डॉ शिवाजी शिंदे
यांनी मार्गदर्शन केले.
या शिबीराच्या यशस्वतेसाठी
रासेयोचे कार्यक्रमाधिकारी प्रा. प्रविण घाटगे, प्रा व्ही एस पवार, प्रा आर बी
क्षीरसागर, प्रा के एस गाडे, प्रा. जी एम माचेवाड, प्रा. भानुदास पाटील आदींनी परिश्रम
घेतले. कार्यक्रमास विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ महेश देशमुख, नवागड संस्थेचे
महामंत्री माणिकराव तर्टे, योग शिक्षक श्री जिंतुरकर, सुदर्शन मोरे, महेंद्र संघई,
बाळ जाधव, लखनजी आदींचे सहकार्य लाभले.
स्वच्छता मोहिम |
रक्तदान शिबीर |