परभणी कृषि विभागाचा आत्मा कार्यालय आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील रेशीम संशोधन योजना यांचे संयुक्त विद्यमाने दि. 2 ऑगस्ट रोजी रेशीम उद्योग प्रात्यक्षिक
प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर हे होते तर महाराष्ट्र ग्रामीण बॅकेचे विभागीय व्यवस्थापक श्री. डि. डि. भिसे, प्रभारी अधिकारी डॉ. सी. बी. लटपटे, डॉ. स्मिता सोळंकी, डॉ. दिनेशसिंह चौव्हाण, केंद्रिय रेशीम मंडळाचे शास्त्रज्ञ श्री. ए. जे. करंडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात संशोधन
संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर म्हणाले की, लहान व मध्यम शेतकयांनी विविध पिकांसोबतच दिड ते दोन एकर क्षेत्रावर तुती लागवड करून रेशीम उद्योग करावा, ज्यामुळे दरमहा वेतनाप्रमाणे पैसा हाती येऊन आर्थिक पाठबळ मिळेल. मराठवाडयात तुती लागवडीखालील क्षेत्रात जालना, बीड जिल्हयानंतर परभणी जिल्हयाचा तिसया क्रमांक असुन बाल्य किटक संगोपन केंद्रे मराठवाडयात मोठया प्रमाणावर सुरू करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
प्रशिक्षणात प्रभारी
अधिकरी डॉ सी बी लटपटे यांनी तुती रोपवाटीका, तुती लागवड, तुती छाटणी, संगोपनगृह निर्जंतुकीकरण, रेशीम किटक संगोपन आदीविषयी शेतकयांना प्रात्यक्षिक करून मार्गदर्शन केले तर डॉ. स्मिता सोळंकी यांनी सोयाबीन
पेरणी, खत देणे, तण नियंत्रण व रासणी एकाच यंत्राणे केल्याचे प्रात्यक्षिक दाखवले. डॉ रामटेक यांनी सुर्याच्या उर्जेवर चालणारे फवारणी यंत्र, बैल संचलीत मिरची कांडप यंत्र, विंधन विहीर आदी यंत्राविषयी माहीती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सी. बी. लटपटे यांनी केले. सुत्रसंचालन श्री. जे. एन. चौडेकर यांनी केले तर आभार तांत्रिक सहाय्यक श्री.शामसुंदर
कदम यांनी मानले. प्रशिक्षण कार्यक्रमास नांदेड, बीड, हिंगोली, जालना, जिल्हयातील 145 शेतकरी उपस्थित होते.