वनामकृविच्या शास्त्रज्ञांचा सल्ला
सध्या बहुतांश: ठिकाणी सोयाबीन पिक शेंगा लागण्याच्या अवस्थेत असुन यावर मोठ्या
प्रमाणात पाने खाणाऱ्या व शेंगा पोखरणा-या अळ्यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तरी शेतकऱ्यांनी
त्वरीत कीटकनाशकाची फवारणी करण्याचा सल्ला वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे कृषि विद्यावेत्ता डॉ. यू. एन. आळसे व किडकशास्त्रज्ञ
प्रा. डी. डी. पटाईत यांनी दिला आहे. प्रती एकर ६० मिली क्लोरॅट्रानिलीप्रोल १८.५ % किंवा १४० मिली इंडाक्झाकार्ब १५.८ % किंवा १८० मिली स्पाइनेटोरॅम ११.७ %, किंवा ५० मिली थायमिथोक्झाम १२.६ % + लॅम्बडा
सायहॅलोथ्रिन ९.३ % यापैकी कोणत्याही एका किटकनाशकाची फवारणी
करावी. हे किटकनाशकाचे प्रमाण फवारणी
पंपाकरिता असुन एकूण प्रमाण प्रती एकर याप्रमाणेच वापरावे. तसेच काही दिवसांपूर्वी
झालेल्या मोठ्या पावसामुळे सोयाबीनवर काही ठिकाणी शेंगा करपा व चारकोल रॉट दिसून येत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी
या रोगांचा प्रसार होऊ नये म्हणून प्रती एकरी कार्बेन्डेझिम १२% + मॅन्कोझेब ६३% या संयुक्त बुरशीनाशकाची २०० ग्रॅम याप्रमाणे
फवारणी करावी.
शेंगा पोखरणारी अळी |
तंबाखूवरील पाने खाणारी अळी |