वाढती शेत मजुरी व हंगामात मजुरांची कमतरता यामुळे पिक लागवडीचा एकुण खर्च वाढत असुन कृषि यांत्रिकीकरणाला पर्याय नाही. परंतु अल्पभुधारक, मध्यम व मोठे भुधारक शेतकरी यांची कृषि औजारे व यंत्राची गरज वेगवेगळी आहे. कृषि यांत्रिकीकरणामूळे
पिक लागवडीचा खर्च कमी होवुन शेतक-यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा करणे शक्य आहे. कृषि यांत्रिकीकरणाकरिता कृषि यंत्र उद्योजक, शेतकरी
व कृषि अभियंते
यांच्यात समन्वयाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ अशोक ढवण
यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील पशुशक्तीचा योग्य वापर अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्पाच्या वतीने कृषी यांत्रिकीकरण दिनानिमित्त दिनांक 28 फेब्रुवारी रोजी बैल व ट्रॅक्टर चलीत सुधारीत औजारांचे प्रदर्शन व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, मेळाव्याच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ प्रदीप इंगोले, विद्यापीठ अभियंता डॉ अशोक कडाळे, परभणी आत्माचे प्रकल्प संचालक श्री. के. आर. सराफ, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ यु एम खोडके, तालुका कृषि अधिकारी श्री. पी. बी. बनसावडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर यांनी शेतक-यांचा व
विद्यापीठ शास्त्रज्ञांंच्या समन्वयातून कृषि यांत्रिकीकरणाची चळवळ गतिमान झाली पाहीजे असे सांगितले तर शेतक-यांनी गटशेतीच्या माध्यमातुन कृषि यांत्रिकीकरण बळकट करून उन्नती साधावी असे मत आत्मा प्रकल्प संचालक श्री के. आर. सराफ यांनी व्यक्त केले.
यावेळी विद्यापीठातील उर्जा उद्यानामध्ये आयोजित सुधारीत कृषि अवजारे, अपारंपारीक उर्जा साधनांचे प्रदर्शन व प्रात्याक्षिकाचे उद्घाटनही कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी केले.
कृषि अवजारे प्रदर्शनात विविध मोठ्या प्रमाणात कंपन्यांची
ट्रॅक्टर चलीत अवजारे, सौरचलीत अवजारे, सुधारीत बैल चलित अवजारांचे प्रात्याक्षिकांचे सादरीकरण केले. तांत्रिक सत्रात सेंद्रीय शेती, रेशीम उद्योग, पशुधन संगोपन, अपारंपारीक उर्जा स्त्रोत आदींविषयावर डॉ सी बी लटपटे, डॉ अे. के. गोरे, डॉ डि. एस. चव्हाण, डॉ आर. टी. रामटेके आदींनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पशुशक्तीचा योग्य वापर प्रकल्पाच्या संशोधन अभियंता प्रा. स्मिता सोलंकी यांनी केले. सुत्रसंचालन डॉ रामप्रसाद खंदारे यांनी केले तर आभार प्रा. डी. डी. टेकाळे यांनी मानले. मेळाव्यास मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातील शेतकरी मोठया संख्येनी सहभागी झाले होते.