कार्यशाळेत देशातील विविध राज्यातील कोरडवाहु फळपिक शास्त्रज्ञ
होणार सहभागी
वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि भारतीय कृषि संशोधन परिषद - कोरडवाहू फळे मध्यवर्ती संशोधन संस्था, बिकानेर यांच्या
संयुक्त विद्यमाने कोरडवाहू फळे संशोधनाच्या राष्ट्रीय वार्षिक कार्यशाळेचे आयोजन दि. 23 ते 25 फेब्रुवारी दरम्यान करण्यात
आले असुन
कार्यशाळेचे उद्घाटन कुलगुरु मा डॉ. अशोक ढवण यांच्या हस्ते दि. 23 फेब्रुवारी रोजी होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून नवी
दिल्ली
येथील भारतीय
कृषि अनुसंधान परिषदेचे सहाय्यक महानिदेशक डॉ. डब्ल्यु एस धिल्लन व बिकानेर येथील कोरडवाहू फळे संशोधन संस्थेचे संचालक तथा प्रकल्प
समन्वयक डॉ. पी. एल. सरोज राहणार असुन राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. तुकाराम मोरे हे विशेष अतिथी राहणार आहेत.
कार्यशाळेत देशातील कोरडवाहू फळे संशोधनाशी निगडीत 70 हून जास्त शास्त्रज्ञ सहभागी होणार असुन प्रगतीशील शेतकरीही सहभागी होऊन कोरडवाहु
फळपिकांतील आपले अनुभव मांडणार आहेत. सदर कार्यशाळेत विविध तांत्रिक चर्चासत्रात संशोधनाचे निष्कर्ष सादर करण्यात येणार असुन वर्षभरातील संशोधन कार्याचा आढावा व
पुढील संशोधनाची दिशा निश्चित करण्यात येणार आहे. कार्यशाळेचे आयोजन संशोधन संचालक डॉ.
दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असुन आयोजक सचिव फळ संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. विश्वनाथ खंदारे हे आहेत.