डॉ इफेरेम हब्यरीमाना यांनी विद्यापीठातील तृणधान्य पिकांतील विविध संशोधन प्रक्षेत्रास भेट देऊन पाहणी
मानवी आहारात
भरड धान्य पिकांस अधिक महत्व असुन इक्रिसॅट संस्थेच्या माध्यमातुन बदलत्या हवामानानुसार
जैवतंत्रज्ञान, निवड पद्धती व संकर यांच्या सहाय्याने अधिक उत्पादक
क्षमता आणि अधिक गुणवत्ता असणारी विविध तृणधान्ये पिके जसे ज्वारी, बाजरी, नाचणी आदी पिकांच्या विविध वाण
विकसित करण्यात येत आहेत, असे माहिती हैद्राबाद येथील आंतरराष्ट्रीय अर्ध-शुष्क उष्ण
कटिबंधीय पीक संशोधन संस्थेचे (इक्रिसॅट) मुख्य शास्त्रज्ञ डॉ इफेरेम हब्यरीमाना यांनी दिली.
आंतरराष्ट्रीय
भरड धान्य वर्षाचे औचित्य साधुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि
वनस्पतीशास्त्र विभाग आणि इंडियन सोसायटी ऑफ जेनेटिक्स अँड
प्लांट ब्रीडिंग परभणी शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १६ फेब्रुवारी रोजी 'शोधाचे
विज्ञान ते वितरणाचे विज्ञान' याविषयावर आयोजित विशेष व्याख्यान देतांना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण संचालक
डॉ. धर्मराज गोखले, विस्तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ. धिरजकुमार कदम, प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल, विभाग प्रमुख डॉ एच व्ही
काळपांडे, सोयाबीन पैदासकार डॉ एस पी म्हेत्रे, सहयोगी संचालक
बियाणे डॉ खिजर बेग, डॉ लक्ष्मण जावळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. इफेरेम हब्यरीमाना पुढे म्हणाले की, हरभरा, तुरी आणि भुईमूग आदी पिकांच्या वाण निर्मितीवर इक्रिसॅट भर देत आहे. इक्रिसॅट आणि परभणी कृषी विद्यापीठ यांच्यात असलेल्या सामंजस्य करारातून कोरडवाहू क्षेत्रासाठी तृणधान्य संशोधनाला चालना मिळाली असुन यातून भारतातील पहिली जैवसंपृक्त (बायोफोर्टिफाइड) ज्वारीचा वाण 'परभणी शक्ती' याची निर्मिती झाली., यात नेहमीच्या ज्वारीपेक्षा जास्त लोह आणि जस्त प्रमाण असल्यामुळे मानवी आरोग्यास लाभदायक आहे.
आभासी माध्यमातुन
मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि यांनी इक्रिसॅट आणि परभणी कृषी विद्यापीठाने
बदलत्या हवामानास अनुकूल भरड पिकांच्या वाण निर्मितीवर संयुक्तपणे संशोधन प्रकल्प
राबविण्यात यावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी डॉ
इफेरेम हब्यरीमाना यांनी विद्यापीठातील तृणधान्य पिकांतील विविध संशोधन प्रक्षेत्रास
भेट देऊन पाहणी केली. कार्यक्रम यशस्वीतेकरिता आयोजक डॉ
एच व्ही काळपांडे, डॉ एस पी म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी
वनस्पतीशास्त्र विभागातील
डॉ. मीना वानखाडे, डॉ. डी. जी. दळवी, डॉ. गोदावरी पवार, डॉ. एच. एच. धूतमल, डॉ. डी.
के. झाटे, डॉ. अंबिका मोरे, डॉ जयकुमार देशमुख आदींसह विभागतील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.