भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संपुर्ण जीवन हे संघर्षमय होते. सामाजिक आणि आर्थिक अडचणीवर मात करुन यांनी आपले उच्च शिक्षण पुर्ण केले व भारत देशाची राज्यघटनेची निर्मिती केली, ही राज्यघटना म्हणजे जगाला दिलेली एक अजोड देणगी असुन संपुर्ण जग त्यांचा सन्मान करतो, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि यांनी केले. कृषि महाविद्यालयाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंती निमित्त अठरा तास अभ्यासमालिकेचे आयोजन दिनांक १३ एप्रिल रोजी करण्यात आले होते, या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ जी एम वाघमारे, विविध विभागाचे विभाग प्रमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती. माननीय कुलगुरू यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि पुढे म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थीदशेत अठरा तास अभ्यास करीत होते. अभ्यासाच्या माध्यमातुन त्यांनी अजोड असे ज्ञान प्राप्त केले, त्यामुळेच भारतीय राज्यघटनेची निर्मिती ते करु शकले. त्यांच्या जीवनचरित्रापासुन विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेवुन आपला जास्तीत जास्त महाविद्यालयीन वेळ हा अभ्यासासाठी द्यावा, असा सल्ला त्यांनी दिला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विद्यापीठ ग्रंथपाल डॉ संतोष कदम यांनी केले. अठरा तास अभ्यासवर्गाच्या उपक्रमात कृषि महाविद्यालयाचे ५०९ विद्यार्थी व विद्यार्थींनीनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमास विद्यापीठातील विद्यार्थी, विद्यार्थीनी, प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
509 Students actively participated in Non-Stop 18 Hour Study (reading)
Campaign organised at VNMAU, Parbhani
On the eve of Birth Anniversary of Bharat
Ratna Dr. Babasaheb Ambedkar & Mahatma Jyotiba Phule campaign organised at
VNMKV, Parbhani
On the eve of Birth Anniversary of Bharat
Ratna Dr. Babasaheb Ambedkar and Mahatma Jyotiba Phule, Vasantrao Naik Marathwada
Agricultural University (VNMAU), Parbhani organised non-stop 18 hour study (reading)
campaign on 13th April, 2023 in the University Library. About 509
students from the College of Agriculture, Parbhani actively participated in
this campaign. The campaign inaugurated by the Vice-Chancellor Dr. Indra Mani
and Director of Instruction Dr.D.N.Gokhale, Principal Dr.G.M.Waghmare, and other
senior officer of the university were present.
In his inaugural speech Dr. Indra Mani
emphasized that Dr. Babasaheb Ambedkar struggled a lot throughout his life. Despite
facing a lot of social and financial challenges, he completed his higher education.
Dr. Ambedkar studied day and night, through his studies, he gained unparalleled
knowledge, due to which he was able to frame the Constitution of India. This
constitution is a unique gift to the world and the whole world respects him. The
students should take inspiration from his life, inculcate his character and thoughts,
it is the real tribute to him.
On this occasion, Dr. Indra Mani worshiped
the Dr. Bharat Ratna Babasaheb Ambedkar and Mahatma Jyotiba Phule. The program
was anchored by University Librarian Dr. Santosh Kadam.