आजच्या ताणतणावाच्या
काळात खेळाच्या माध्यमातुन शरीर व मन हे ताजेतवाने राहाते. खेळाच्या स्पर्धेतुन विद्यापीठात एक
खेळीमेळीचे वातावरण निर्माण होण्यास निश्चीतच मदत होणार आहे असे प्रतिपादन
मराठवाडा कृषि विद्यापीठाचे मा. कुलगुरू, डॉ. किशनरावजी गोरे यांनी मराठवाडा कृषि
विद्यापीठामध्ये आयोजित कर्मचारी क्रीडा स्पर्धा 2013 उदघाटन प्रसंगी केले. या
प्रसंगी शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता डॉ. विश्वासरावजी शिंदे, विस्तार शिक्षण
संचालक डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ. गोवर्धन खंडागळे, प्रभारी कुलसचिव श्री बी एम गोरे, सहयोगी अधिष्ठाता तथा
प्राचार्य डॉ. एन. डी. पवार, डॉ. डी. एन. गोखले, डॉ. दत्तप्रसाद वासकर, डॉ. सत्वधर,
प्रा. विशाला पटनम, डॉ. के. टी. आपेट, प्रा. दिलीप मोरे यांची प्रमुख उपस्थिती
होती. दिनांक 27 ते 29 एप्रील 2013 दरम्यान प्रथमच मराठवाडा कृषि विद्यापीठा
आयोजित करण्यात आल्या आहेत. मा. डॉ. के. पी. गोरे पुढे म्हणाले की, विद्यापीठातील
कर्मचा-याचा दैनंदिन कार्यालयीन कामाचा ताण कमी होण्यासाठी या प्रकारच्या क्रीडा
स्पर्धा विद्यापीठात नियमीत आयोजित करण्यात याव्यात. या क्रीडा स्पर्धेमार्फत
कर्मचा-यातुन विद्यापीठातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विविध खेळाचे
प्रशिक्षक निर्माण होतील असी अपेक्षा व्यक्त केली.
याप्रसंगी मा
कुलगुरूच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलीत करून उदघाटन करण्यात आले. या
प्रसंगी शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता डॉ. विश्वासरावजी शिंदे यांनी आपल्या
भाषणात सांगीतले की, जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास गरजेचा आहे
आणि यासाठी खेळाच्या माध्यमातुन आपण प्रतिकुल परिस्थितीस तोंड देण्याचे बळ
आपणास मिळते. या क्रीडा स्पर्धेमुळे विद्यापीठ कर्मचा-यामध्ये चैतन्य व प्रेरणा
निमार्ण होईल. कृषि महाविद्यालय, लातुरचे सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ. दत्तप्रसाद
वासकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
उदघाटन कार्यक्रमाचे
प्रास्तावीक क्रीडा स्पर्धेचे कार्याध्यक्ष डॉ. महेश देशमुख यांनी केले. सुत्रसंचालन
डॉ. विणा भालेराव यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. एच. व्ही. काळपांडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा स्पर्धेच्या आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ.
अनिल गोरे तसेच सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी परिश्रम घेतले. या क्रीडा स्पर्धेत
क्रिकेट, कबड्डी, बॅडमिंटन, हॉलीबॉल, कॅरम, रस्सीखेच, बुध्दीबळ, आदी क्रीडा
प्रकाराचा समावेश असून यामध्ये मोठया प्रमाणात विद्यापीठातील अधिकारी आणि
कर्मचा-यांनी सहभाग नोंदविला आहे. या स्पर्धेनिमित्त प्रदर्शनी सामान्य दरम्यान जमा होणाऱ्या नोंदणी फिसचा काही भाग हा दुष्काळग्रस्त निवारणासाठी देण्यात येणार आहे.