मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिरात उत्कृष्ट कार्याबाबत रमाकांत कारेगांवकर याची उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून निवड करण्यात आली. त्यानिमित्य विद्यापीठाचे मा कुलगुरू डॉ किशनरावजी गोरे यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी शेर-ए-काश्मिर कृषि विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठ (जम्मु) चे माजी कुलगूरू तथा कृषी विज्ञान राष्ट्रीय अकॅडमीचे सचिव मा डॉ अन्वर आलम, स्वामी विवेकानंद तंत्रज्ञान विद्यापीठ (भिलाई) चे कुलगूरू डॉ बी सी मल, भारतीय कृषि संशोधन परिषदेचे माजी सहायक महासंचालक तथा फरिदाबाद येथील एस्कॉर्ड लिमीटेडचे सल्लागार मा डॉ एस के टंडन, दापोली येथील डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे माजी कुलगूरू डॉ शंकरराव मगर, डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे माजी कुलगूरू मा डॉ व्ही एम मायंदे, नवी दिल्ली येथील भारतीय कृषि विद्यापीठ संघटनेचे सचिव मा डॉ आर पी सिंग, सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ अशोक कडाळे, कार्यक्रम अधिकारी प्रा रवींद्र शिंदे, प्रा संजय पवार, प्रा सुमंत जाधव, प्रा सुभाष विखे, सौ प्रमोदिनी मोरे उपस्थित होते. या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिरातशेततळ्याच्या मातीचे अस्तरीकरण, पाणी अडविणे व पाणी जिरविणे याचे प्रात्यक्षिक, परिसर स्वच्छता, रक्तदान, योगासने व प्राणायाम, महिला स्व-सुरक्षा, व्यसन मुक्ती आदी उपक्रम राबविण्यात आले होते. या उपक्रम मध्ये रमाकांत कारेगांवकर याने सक्रिय सहभाग घेऊन एक उत्कृष्ट स्वयंसेवकाचे कार्य केले यानिमित्ये त्याची उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून निवड करण्यात आली.