भारतीय हवामान विभाग, मुबई यांचेकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार, मराठवाडा विभागामध्ये या आठवडयात आकाश ढगाळ राहून तुरळक
ठिकाणी हलका पाउस पडण्याची शक्यता
आहे. कमाल तापमान २९.० ते ३४.० अंश सेल्सीअस राहील तर किमान तापमान २३.० ते २५.०
अंश सेल्सीअस राहील. वारे ताशी १३.० ते २०.० कि.मी. प्रति तास वेगाने पश्चिम
दिशेने वाहतील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६५.० ते ७९.० टक्के तर दुपारची सापेक्ष
आर्द्रता ३७.० ते ५३.० टक्के राहील.
विशेष सुचना - या आठवडयात आकाश ढगाळ राहून तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा
पाउस पडण्याची शक्यता आहे. तसेच उगवुन आलेल्या खरीप
पिकांवर पाने खाना-या किडीचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता आहे.
कृषी सल्ला
पेरणी योग्य पाउस
झालेल्या ठिकाणी सोयाबीनची पेरणी या आठवडयात पूर्ण करावी. पेरणीसाठी एमएयुएस-७१, जेएस-३३५, एमएयुएस-१५८ या पैकी
एका वाणाची निवड करावी. बियाण्यास रायझोबीयम व पीएसबी जैविक खताची बीज प्रक्रिया
करूनच पेरणी करावी.
बाजरीची पेरणी या
आठवडयात पुर्ण करावी. हेक्टरी ३ किलो बियाण्याचा वापर करावा. पेरणी करताना
बियाण्यात दानेदार खत मिसळुन पेरल्यास बीयाने योग्य अंतरावर पडून रोपांची संख्या
प्रति हेक्टरी अधिक होणार नाही. पेरणीसाठी जीएचबी-५५८, सध्दा, सबुरी व एएचबी-१६६६ या पैकी एका वाणाची निवड करावी.
मुग/उडीदाची पेरणी या
आठवडयात पूर्ण करावी. पेरणीसाठी मुगाचे बीएम-२००२-१, बीएम-२००३-२, एकेएम-४ व ग्रीनगोल्ड तर उडीदाचे बीडीयु-१ व
टीएयु-१ या पैकी एका वाणाची निवड करावी. बियाण्यास रायझोबीयम व पीएसबी जैवीक
खताची प्रक्रिया करावी.
हळद व आले पिकाची
लागवड या आठवडयात पूर्ण करावी. हळद लागवडीसाठी सेलम, कृष्णा व लोखंडी तर आलेच्या माहिम, जानेडोरीओदो, सुरूची किंवा सुप्रभा
या पैकी एका वाणाची निवड करावी. लागवडीपूर्वी बेणे बावीष्टीनच्या द्रावणात
बुडवूण घ्यावे. हळद व आल्याची लागवड ६० x ३० सेंमी अंतरावर करावी. लागवडी सोबत १५०:५०: ५० (नत्र: स्फुरद: पालाश) रासायनिक खताची मात्रा दयावी.
डाळिंबाची लागवड
करावयाची असल्यास उत्तम निचरा होणा-या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या जमीनीची निवड
करावी. डाळिंबाची लागवड ६० x ६० x ६० सें.मी. आकाराच्या
खडयात ५ x ५ मिटर अंतरावर करावी. लागवडी सोबत २० किलो शेणखत व
१ किलो सुपर फॉस्फॅटचा वापर करावा. लागवडी सोबत प्रति खडा ५० ग्रॅम लींडेन
पावडरचा वापर करावा.
चिकुचे नविन कलमांची
लागवड १०x१० मी. अंतरावर करावी. यासाठी कालीपत्ती, पीलीपत्ती, किक्रेटबॉल, छत्री इत्यादी
पैकीएका वाणाची निवड करावी. लागवडीसोबत १ किलो सिंगल सुपर फॉस्फेट प्रति झाड वापर
करावा.
या आठवडयात बोरीची
कलमीकरण करून घ्यावे. कलमीकरणासाठी उमराण, गोला, कडाका, सनुर-६, छुवारा, इलायची, मुक्ता या पैकी वाणाची निवड करावी.
मे महिन्यात तयार
करण्यात आलेल्या मीरचीच्या रोपांची या आठवडयात पूनरलागवड करावी. मीरचीची रोपे
लागवडी पूर्वी किटकनाशक व बुर्शीनाशकाचे द्रावणात बुडवुनच लागवड करावी.
गोचीडांचा प्रादूर्भाव वाढुनये म्हणून जनावरांची गोटे मेटारायीझमचे
द्रावणानी फवारून घ्यावीत.
सौजन्य
केंद्र प्रमुख
कृषी हवामानशास्त्र विभाग
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
पञक क्रमांकः २१
दिनांकः २१.०६.२०१३