मराठवाडा कृषि विद्यापीठ
अंतर्गत असणा-या परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्या कृषि पदवीच्या सातव्या
सत्रातील विद्यार्थ्याचा ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाचे उद् बोधन कार्यक्रमाचे आयोजन
दिनांक 13-06-2013 रोजी कृषि महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. एन. डी.
पवार होते.
ग्रामीण कृषि कार्यानुभव
कार्यक्रमात कृषि महाविद्यालयांच्या सातव्या सत्रातील 170 विद्यार्थी असून ते
परभणी तालुक्यातील निवडलेल्या 17 गावामध्ये पुढील 20 आठवडे जाउन त्यांनी पदवी
अभ्यासक्रमात आत्मसात केलेले कृषीचे ज्ञान व कृषि विद्यापीठाने विकसीत केलेले
नवीन तंत्रज्ञान व विविध पिकांच्या जाती तसेच रोग व किड नियंत्रण या विविध विषयांबाबत
पाल्य शेतक-यांसोबत विचारांची देवाणघेवाण करणार आहेत. तसेच ग्रामीण भागातील
शेतक-यांचे जीवनमान व त्यांचे कृषि क्षेत्रातील अनुभव याचा जवळून अभ्यास करण्यासाठी
हा ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम पदवी अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात
आलेला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना कृषि विस्तार शिक्षणाचे कौशल्ये प्राप्त
होणार आहे.
या प्रसंगी अध्यक्षीय
भाषणात सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. एन. डी. पवार म्हणाले की, ग्रामीण कृषि
कार्यानुभव कार्यक्रमामुळे कृषि पदवीधरांना शेतक-यांचे जीवनमान व त्यांच्या शेती
करण्याच्या पध्दती जवळून पाहण्याची संधी प्राप्त होते. तसेच विद्यापीठाचे
तंत्रज्ञान शेतक-यांमध्ये कशा पध्दतीने प्रसार करावा याबाबतचे विस्तार
शिक्षणाच्या कौशल्याची माहीती होते. या सर्व कृषिदुतांनी निवडलेल्या 17
गावांमध्ये कृषि विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न
करावा असा सल्ला त्यांनी दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकात
कार्यक्रम समन्वयक तथा विभाग प्रमुख डॉ. बी. एम. ठोंबरे यांनी विद्यार्थ्यांना
ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम राबविण्याबाबतचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे
सूत्रसंचलन डॉ.आर.पी. कदम यांनी, तर आभार प्रदर्शन डॉ. पी. आर. देशमुख यांनी केले.
तांत्रीक सत्रामध्ये विविध विषयतज्ञ डॉ. ए. पी.
सुर्यवंशी, डॉ. एस. जी. नरवाडे, प्रा. जी. डी. गडदे, प्रा. एस. डी. जेटुरे, प्रा.
ए. डी. मोरे, प्रा. एस.एच.कांबळे, प्रा. मोहमद ईलीयास, डॉ. एल. एन. जावळे, प्रा.
ए. एम. कांबळे व डॉ. पी. आर. देशमुख यांनी विद्यार्थ्यांना विविध विषयांवर
मार्गदर्शन केले.
कार्यक्रम
यशस्वीतेसाठी डॉ. एन. जी. लाड, डॉ. जे. व्ही. एकाळे, डॉ. पी. एस. कापसे, श्री
सी. एस. नखाते, श्री विठ्ठल खताळ, श्री जी. के. जोशी आदींनी परिश्रम घेतले. या
प्रसंगी विविध संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. ए.एस. कारले, डॉ. बेग, डॉ.
आळसे, डॉ. नारखेडे, डॉ. मोरे व कार्यक्रम अधिकारी प्रा.खोब्रागडे, प्रा. पवार, डॉ.
प्रा. बडगुजर, डॉ. नागरगोजे, प्रा. एस.एस. शिंदे, उपस्थित होते.