वनामकृवित महिला शेतकरी मेळावास मोठा प्रतिसाद
महिला शेतकरी मेळाव्याचे उदघाटन करतांना |
मार्गदर्शन करतांना प्रख्यात लेखिका मा डॉ प्रतिमा इंगोले |
मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा डॉ बी व्यंकटेश्वरलु |
प्राचीन युगात शेतीचा शोध स्त्रीनेच
लावला असुन समाज हा मातृसत्ताक होता.
संस्कृतीचे रक्षण स्त्रीनेच केले आहे. आर्यांच्या काळात समाज हा पित्रसत्ताक
बनला, पुरूष मालक व स्त्री मजुर झाली. आजची शेतक-यांची बिघडलेली परिस्थिती
बदलायची असेल तर स्त्री शेतीत निर्णयकर्ती झाली पाहिजे, असे प्रतिपादन सामाजिक
कार्यकर्त्या पुणे येथील प्रख्यात लेखिका मा डॉ प्रतिमा इंगोले यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालय, गृहविज्ञान महाविद्यालय व कृषि
विभाग यांचे संयुक्त विद्यमाने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त दि ३ जानेवारी रोजी आयोजित महिला
शेतकरी मेळाव्याच्या उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्यंकटेश्वरलु होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन
परभणी महानगरपालिकाच्या महापौर मा सौ संगीता वडकर उपस्थित होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर
विद्यापीठ कार्यकारी परिषदचे सदस्य श्री रविंद्र पतंगे, शिक्षण संचालक डॉ अशोक
ढवण, संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले,
विद्यापीठाचे कुलसचिव डॉ डि एल जाधव, जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास समीतीच्या
सभापती सौ अनिता जैस्वाल, गृहविज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ हेमांगिनी
सरंबेकर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री साहेबराव दिवेकर, आत्माचे संचालक एम
एल चपळे, आदिवासी प्रकल्प अधिकारी यु ए धाबे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्रख्यात लेखिका मा डॉ प्रतिमा
इंगोले पुढे म्हणाल्या की, शेतीचे तंत्रज्ञान स्त्रीला उपजतच माहित असते. स्त्री
व माती यात साधर्म्य असुन बहिनाबाईच्या साहित्यात स्त्री व भुमी समान मानले
आहे. स्त्रीला ताकद द्या, शेतीच्या सात-बारावर स्त्रीचे नाव लागले गेले पाहीजे.
पुरूषांनी गृहविज्ञान शिकावे तर स्त्रीयांनी शेती तंत्रज्ञान शिकवा. आज समाजात
शेतक-यांप्रती संवेदनशिलता कमी होत असुन शेतक-यांची उपेक्षा होत आहे. शेतक-यांच्या
आत्महत्या रोखण्यासाठी स्त्रीनेच पुढाकार घ्यावा, असे मत यावेळी त्यांनी व्यक्त
केले.
अध्यक्षयीय भाषणात कुलगुरू मा.
डॉ. बी. व्यंकटेश्वरलु म्हणाले की, शेतीतील ८० टक्के कामे ही स्त्रीयाच
करतात, त्यांची शेतीतील भुमिका महत्वाची असुन महिलांच्या कार्याचा गौरव समाजात
झाला पाहिजे. शेतक-यांच्या चांगल्या शेत मालाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी
शेती उत्पादक – ग्राहक उपक्रम राबविण्याचा वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठाचा मानस असुन भविष्यात प्रत्येक जिल्हयात महिला शेतकरी मेळावा घ्यावा
म्हणजे महिला शेतक-यांना मेळाव्यात सहभाग वाढेल, असा सल्लाही त्यांनी दिला.
परभणी महानगरपालिकाच्या महापौर
मा सौ संगीता वडकर यांनी आपल्या भाषणात आजच्या विज्ञान युगात स्त्रीची जबाबदारी
वाढली असुन पिढी घडविण्याचे कार्य महिला करते, असे प्रतिपादन केले. मनोगतात विस्तार
शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांनी शेतकरी आत्महत्या टाळण्यासाठी विद्यापीठ उमेद
उपक्रम राबवीत असुन त्यात शेतकरी महिलांनी योगदान देण्याचे आवाहन केले तर
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गृहविज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ हेमांगिनी
सरंबेकर यांनी केले.
मेळाव्यात प्रगतशील महिला
शेतकरी सौ पुष्पाताई मुंढे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. विभाग
प्रमुख डॉ राकेश आहिरे व श्री चंद्रशेखर नखाते यांनी संपादीत केलेल्या कृषि
दिनदर्शीकेचे प्रकाशन तसेच शेतीभाती मासिकाच्या महिला विशेषांकाचे व विद्यापीठ
शास्त्रज्ञ लिखित विविध प्रकाशनाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
विद्यापीठातील विविध तंत्रज्ञानावर आधारित दालनाचा कृषि प्रदर्शनीस मोठा प्रतिसाद
लाभला. मेळाव्यास महिला शेतक-यांनी व शेतकरी बांधवानी मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ विना भालेराव यांनी तर आभार प्रदर्शन डॉ माधुरी कुलकर्णी
यांनी केले. मेळाव्याच्या तांत्रिक सत्रात डॉ बी एम ठोंबरे हे कुक्कुटपालन व
दुग्धव्यवसाय व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले तसेच महिलांसाठी
खाद्यपदार्थ निर्मितीशी निगडीत गृहउद्योग यावर डॉ विजया नलावडे, शेतीतील टाकाऊ पदार्थापासुन
उपयुक्त वस्तुची निर्मितीबाबत डॉ जयश्री झेंड, भाज्या व फळांचे संरक्षण व
साठवणुक यावर प्रा दिलीप मोरे, कौटुंबिक ताण-तणाव
व्यवस्थापनात गृहिणीची भुमिका यावर डॉ जया बंगाळे व कपडयांचे नुतनीकरण यावर डॉ
सुनिता काळे यांनी मार्गदर्शन केले.
कृषि प्रदर्शनीचे उदघाटन करतांना |
कृषि दिनदर्शीकचे विमोचन करतांना शेतीभाती मासिकाचे विमोचन करतांना |
प्रख्यात लेखिका मा डॉ प्रतिमा इंगोले यांनी मेळाव्यात सादर केलेली कविता
सात बारा
शेतक-याची बाई तील मुलखाची घाई,
हे कर ते कर, सगळे कष्टाचे डोंगर,
उपटती बिचारी कमरेवर हात ठेऊन
जगत असते बिचारी दैवावर हवाला ठेऊन
घर नव-याच, दार नव-याच,
शेतीवाडी नव-याची, मुलबाळ तिही नव-याची
करडा कोंडा खात जगत असते शेतक-याची बाई
घरातलं दारातलं व शेतातलं निपटते शेतक-याची बाई
गोल करकरीत कुंकू तिच्या कपाळावर
तर चिरेचिरे तिच्या खरबडीत तळहातावर
पण हातात तिच्या काही काहीच नाही
अनं सात बारावर तिचे नाव तेही नाही,
|