राज्यातील
शेतक-यांच्या होणा-या आत्महत्या रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन, राज्याचा कृषि
विभाग, जिल्हा परिषदेचे
कृषि विभाग, सामाजिक संस्था व
कृषि विद्यापीठ या सर्वांनी सामुदायिकरित्या शेतक-यांच्या उन्नतीसाठी कार्य
करणे गरजेच आहे, असे प्रतिपादन पाणीपुरवठा
व स्वच्छतामंत्री मा ना श्री बबनराव लोणीकर यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथे दि ९
जानेवारी रोजी विद्यापीठातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचा-यांच्या बैठकीत मार्गदर्शन
करतांना केले. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ बी व्यंकटेश्वरलु, माजी आमदार अॅड
विजयराव गव्हाणे, शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण
संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ डि एल जाधव आदींसह विद्यापीठातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी
उपस्थित होते.
मार्गदर्शन करतांना
मा ना श्री बबनराव लोणीकर पुढे म्हणाले, की वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत
असलेले बदनापुर येथील संशोधन केंद्राने विकसित केलेल्या तुर पीकाचे विविध वाण आज
संपुर्ण राज्यात व देशात पोहचले आहे. शेतकरी आज ढोबळ पध्दतीने शेती करीत नसुन शेतक-यांनी
आधुनिक शेतीची कास धरली आहे. विद्यापीठाचे
आधुनिक तंत्रज्ञान शेतक-यांच्या बांधावर गेले पाहीजे. कृषि विद्यापीठाचे महत्व
जनतेला समजले पाहिजे. कृषि विद्यापीठ हे शेतक-यासाठी शक्तीस्थान व आदर्श ठरली
पाहिजे, अशी यापेक्षा
यावेळी त्यांनी व्यक्त केले. शासन दरबारी कृषि विद्यापीठाचे प्रलंबित प्रश्न
मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. मा अॅड
विजयराव गव्हाणे विद्यापीठाचे कृषि संशोधन व शिक्षण बळकट करण्याची अपेक्षा व्यक्त
केली. यावेळी कुलगुरू डॉ बी व्यंकटेश्वरलु यांनी विद्यापीठाच्या कार्याबाबत
माहिती देतांना सांगितले, की विद्यापीठाचे तुरच्या विविध वाणासह सोयाबीनचे एमएयुएस-१६२ हे वाण
शेतक-यांमध्ये मोठया्प्रमाणात प्रचलित होत असुन यावर्षी कृषि विभागाच्या
सहकार्याने सोयाबीनमध्ये रूंद वरंबा व सरी पध्दतीचा मोठा प्रसार करण्यात आला त्याचा
लाभ शेतक-यांना झाला असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विस्तार
शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांनी शेतक-यांना दुष्काळास्थितीत दिलासा देण्यासाठी
राबविण्यात येत असलेल्या विद्यापीठाच्या उमेद उपक्रमाची माहिती दिली तर संशोधन
संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर यांनी मोसमी संशोधनाबाबत माहिती दिली. शिक्षण संचालक
डॉ अशोक ढवण यांनी कृषि शिक्षणाबाबत तर कुलसचिव डॉ डी एल जाधव यांनी विद्यापीठाच्या
कार्यक्षेत्र व कार्याबाबत माहिती दिली. याप्रसंगी विद्यापीठाची कृषि दैनंदिनी
कुलगुरू मा डॉ बी व्यंकटेश्वरलु यांच्या हस्ते मा. ना बबनराव लोणीकर यांना भेट
देण्यात आली. याबैठकीस विद्यापीठाचे विविध महाविद्यालयाचे प्राचार्य व विभाग
प्रमुख उपस्थित होते.