वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील
कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र
व सेनगांव तालुका कृषि अधिकारी
यांच्या संयुक्त विद्यमाने
हिंगोली जिल्हयातील सेनगांव
तालुक्यातील मौजे माझोड
येथे राष्ट्रीय कृषि विकास
योजना एकात्मिक तंत्रज्ञान
प्रसार प्रकल्पांतर्गत
शेतकरी मेळावा व प्रक्षेत्र
भेट कार्यक्रमाचे आयोजन दिनांक
१५ जानेवारी रोजी करण्यात
आले होते.
कार्यक्रमाचे
उद्घाटन कुलगुरु मा.
डॉ.
बी.
व्यंकटेश्वरलू
यांच्या हस्ते करण्यात
आले तर कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी गावच्या
सरपंचा श्रीमती अनुसयाताई
भोने होत्या व प्रमुख पाहुणे
म्हणुन विस्तार
शिक्षण संचालक डॉ.
बी.
बी.
भोसले,
हिंगोली
आत्माचे प्रकल्प संचालक
श्री.
एस.
बी.
आळसे
यांची उपस्थिती होती.
मुख्य
विस्तार शिक्षण अधिकारी डॉ.
पी.
आर.
देशमुख,
विस्तार
कृषि विदयावेत्ता डॉ.
यु.
एन.
आळसे,
आत्माचे
प्रकल्प उपसंचालक श्री.
तीर्थकर,
कृषि
विज्ञान केंद्राचे डॉ.
शेळके,
तालुका
कृषि अधिकारी श्री.
आर.
बी.
हरणे,
मंडळ
कृषि अधिकारी श्री.
जी.
जे.
बळवंतकर
आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरु
मा.
डॉ.
बी.
व्यंकटेश्वरलु
उद्घाटनपर भाषणात म्हणाले
कि,
राजस्थान
सारख्या राज्यात अत्यल्प
पर्जन्यमान आहे तर ओरिसा
सारख्या राज्यात ओला दुष्काळ
असतो परंतू तेथील शेतकरी
संकटाना धीराने तोंड देऊन
आत्महत्याचा विचार करित
नाहीत.
महाराष्ट्र
राज्यातील शेतक-यांनी
खचुन न जाता नव्या उमेदीने
आलेल्या संकटाला सामोरे
जावे.
महाराष्ट्र
शासन व कृषि विदयापीठ सदैव
आपल्या पाठीशी आहेत.
शेतक-यांना
यापुढे शेतीतील पाणी व्यवस्थापनावर
जास्त लक्ष केंद्रीत करावे,
विदयापीठाच्या
विविध कमी खर्चीक तंत्रज्ञानाचा
शेतक-यांनी
अवलंब करावा,
असे
अवाहन त्यांनी केले.
विस्तार
शिक्षण संचालक डॉ.
बी.
बी.
भोसले
आपल्या भाषणात म्हणाले की,
कुठल्याही
समस्येला आत्महत्या हा
उपाय नाही,
आत्महत्येनी
समस्या न सुटता उलट प्रश्न
वाढणार आहेत,
तुमच्यानंतर
तुमच्या कुटुंबाच्या समस्या
कोण सोडवणार?
त्यामुळे
शेतक-यांनी
आत्महत्येचा अवलंब करु
नये.
हिंगोली
आत्माचे प्रकल्प संचालक
श्री.
एस.
बी.
आळसे
यांनी शेतक-यांनी
गटशेतीचा अवलंब करावा,
त्याकरिता
आत्माव्दारे शेतक-यांना
कंपनी स्थापन करण्यासाठी
व शेतीपुरक उदयोग चालु करण्यासाठी
प्रशिक्षण देण्यात येईल,
असे
सांगितले.
मेळाव्यात
टंचाई परिस्थितीत दुग्धव्यवसाय
व चाराव्यवस्थापन या विषयावर
डॉ.
अे.
टी.
शिंदे,
पिकांवरील
रोग व्यवस्थापनावर
डॉ.
व्ही.
एम.
घोळवे,
किड
व्यवस्थापनावर प्रा.
डी.
डी.
पटाईत
यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे
प्रास्ताविक विस्तार कृषि
विदयावेत्ता डॉ.
यु.
एन.
आळसे
यांनी यांनी केले तर सुत्रसंचालन
प्रा.
डी.
डी.
पटाईत
यांनी केले.
कार्यक्रमास
परीसरातील शेतकरी बंधु व महिला
मोठया संख्येने उपस्थित
होते.
मान्यवरांनी
विदयापीठाव्दारे राष्ट्रीय
कृषि विकास योजनेंतर्गत माझोड
गावात घेण्यात आलेल्या ५०
पीक प्रात्यक्षिकांपैकी
शेतकरी श्री.
गजानन
शेळके,
श्री.
विष्णू
घोगरे,
श्री.
बबनराव
लांडगे यांच्या प्रात्यक्षिकास
भेट देउुन रबी ज्वारी पीकाची
पाहणी केली.
कार्यक्रम
यशस्वीतेसाठी श्री.एस.बी.
जाधव,
श्री
हनुमान बनसोडे,
कृषि
पर्यवेक्षक श्री.
बी.
एल.
बोरकर,
श्री.
व-हाडे,
श्री.
अनिल
खिलारे तसेच रेणुका माता
प्रतिष्ठाणाच्या पदाधिकारी
व गावक-यांनी
परिश्रम घेतल.
टिप-सदरिल बातमी कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे केंद्र व्यवस्थापक यांच्या ईमेल व्दारे प्राप्त