हिंगोली जिल्हातील सेनगांव तालुक्यातील मौजे बेलवाडी
येथील दुग्धव्यवसाय करणारे प्रगतशील शेतकरी श्री रामेश्वर मांडगे
यांचे दुध डेअरी
फार्मवर दि. १४ जानेवारी
रोजी कुलगुरु मा. डॉ. बी
वेंकटेश्वरलु, विस्तार
शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, पशुसंवर्धन
व दुग्धशास्त्र विभागाचे डॉ. अे. टी. शिंदे, ज्वार
संशोधन केंद्राचे डॉ. विक्रम
घोळवे, मुख्य
विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. पी. आर. देशमुख
यांनी भेट दिली.
श्री मांडगे यांनी जिदद् व मेहनतीच्या बळावर दुग्धव्यवसाय केवळ एक म्हैस व तीन एक्कर
जमीनीवर सुरु करुन आज घडीला त्यांचेकडे ७० म्हैसी व १०० एकर जमीन केवळ एकत्रित
कुटूंबाच्या प्रयत्नातुन शक्य झाल्याचे सांगितले, त्यांच्या
शेतावर दुग्ध उत्पादन तंत्रज्ञानाचे अवलंबन करुन दररोज जवळपास ४०० लिटर दुध
उत्पादन करुन हिंगोली शहरात विक्री करुन संपूर्ण कुटूंब आत्मनिर्भर झाल्याचे सांगितले. दुधाची
प्रत अत्यंत चांगली असल्यामुळे त्यांना प्रति लिटर ६० /- रुपये दर मिळत
आहे.
कुलगुरु मा.
डॉ. बी. वेंकटेश्वरलू यांनी
त्यांच्या मेहनतीचे व व्यवसायप्रती निष्ठा
याबाबत गौरव उदगार काढुन
त्यांच्या वडीलांसह विद्यापीठास
भेट देण्याचे आमंत्रण
दिले तसेच विद्यापीठातील
विद्यार्थ्यांना त्यांच्या दुग्धव्यवसायास भेट आयोजित करण्याचे सुचविले.
विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी बी
भोसले यांनी त्यांच्या व्यवसाय यशस्वीतेची महती त्यांच्या वडीलांची पुण्याई म्हणुन
एकत्रित तीन पिढयामुळे यशस्वी दुग्ध व्यवसाय टिकवण्याचे शक्य झाले व
विद्यापीठाच्या वतीने दुग्धव्यवसावर
प्रक्रियासंबधी प्रशिक्षण व मदत करण्याचे आश्वासन दिले.