वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्या मृदविज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागाच्या वतीने जमीनीचे आरोग्य
जागृती अभियान राबविण्यात येत असुन दिनांक ७ जानेवारी रोजी मानवत तालुक्यातील नागरजवळा येथे फिरती माती परिक्षण प्रयोगशाळेचे
एक दिवसीय माती परिक्षण शिबीर आयोजीत केले होते. या शिबीरात गावातील साधारणत: दिडशे शेतकऱ्यांनी
सहभाग घेतला व मातीचे नमुणे गोळा करुन माती परिक्षणासाठी सादर केले. सदरिल
अभियान विभाग प्रमुख डॉ. व्हि. डी. पाटील यांच्या
मार्गदर्शनाखाली प्राध्यापक डॉ ए एल धमक
व सय्यद जावेद जानी राबविते
आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी
कृषि महाविद्यालयातील विद्यार्थी कृष्णा होगे व इतर विद्यार्थीनीं, विभागातील कर्मचारी
व समस्त गावकरी मंडळीनी परिश्रम घेतले.
टिप - सदरिल बातमी विभाग प्रमुख, मृदविज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभाग, वनामकृवि, परभणी यांच्या कडुन प्राप्त.