देशात नैसर्गिक लाख व
डिंक यांचे उत्पादन हे पारंपारीक पध्दतीने मुख्यत: वन व आदीवासी भागात घेतले
जाते, त्याची कच्चा मालाच्या स्वरूपातच
विक्री होते. यापासुन मोठा प्रमाणात देशाला विदेशी चलन प्राप्त होते. नैसर्गिक
लाख व डिंक यावर प्रक्रिया करून मुल्यवर्धीत पदार्थ तयार करून विक्री केल्यास
निश्चितच शेतक-यांचे उत्पादन वाढण्यास मदत होईल, असे
प्रतिपादन रांची येथील नैसर्गिक लाख व डिंक संस्थेचे संचालक डॉ के के शर्मा यांनी
केले.
वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय नैसर्गिक लाख व डिंक काढणी, प्रक्रिया व मुल्यवर्धन जोडणी
प्रकल्प व भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे रांची येथील भारतीय नैसर्गिक लाख व डिंक
संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १९ व २० नोंव्हेबर रोजी अकराव्या
वार्षिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असुन या कार्यशाळेच्या उदघाटनाप्रसंगी ते
बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते तर व्यासपीठावर
संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, रांची येथील प्रकल्प
समन्वयक डॉ निरंजन प्रसाद, प्राचार्य डॉ अरविंद सावते,
डॉ राजेश क्षीरसागर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात
कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्हणाले की, आज प्रक्रियायुक्त अन्न पदार्थात मोठया प्रमाणात नैसर्गिक लाख व डिंकाचा
उपयोग होत आहे. गवार पिक हे कमी पाण्यावर येणार व पाण्याचा ताण सहन करणारे असुन
मराठवाडयात गवार बियांच्या उत्पादनास वाव आहे. गवार बियांच्या डिंक तयार करण्यास
उपयोग होतो, याचा वापर विविध खाद्यपदार्थामध्ये तसेच औषधी,
कागद, कापड, सौदर्यप्रसाधने
उद्योगात होतो. या दुलर्क्षीत पिक लागवडीस मराठवाडयात कोरडवाहु शेतीत वाव आहे.
परंतु या पिकाची राज्यातील उत्पादकता कमी आहे, यासाठी
चांगले उत्पादन देणा-यां वाणाचा विकास करावा लागेल, असे
प्रतिपादन त्यांनी केले.
यावेळी डॉ निरंजन
प्रसाद यांनी नैसर्गिक लाख व डिंक यावरील देशात चालु असलेल्या संशोधनाबाबत आढावा
सादर केला तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर यांनी
केले. सुत्रसंचालन डॉ अनुप्रिता जोशी यांनी केले तर आभार डॉ राजेश क्षीरसागर यांनी
मानले.
सदरिल कार्यशाळेत
देशातील नऊ राज्यातील शास्त्रज्ञ सहभागी झाले असुन ते नैसर्गिक लाख व गवार डिंक
या पीकाची काढणी, प्रक्रीया
व मुल्यवर्धन यावरील संशोधन निष्कर्षचे सादरिकरण करणार आहेत तसेच या क्षेत्रातील
संशोधनाची पुढील दिशा निश्चित करण्यात येणार आहे. कार्यक्रमास विद्यापीठातील शास्त्रज्ञ
व अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ दिलीप मोरे,
डॉ हेमंत देशपांडे, डॉ के एस गाडे, डॉ बी एस आगरकर, डॉ पी यु घाटगे, डॉ एस के सदावर्ते, डाॅ एस पी म्हेत्रे, डाॅ दिनेश चौहान, डाॅ व्ही एस खंदारे, डॉ जी एम माचेवाड, डॉ बी ए जाधव,
डॉ विजया पवार, चंद्रलेखा भोकरे, अमोल खापरे, शिवकुमार सोनकांबळे, श्री
बी एम पाटील आदीसह अन्नतंत्र महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी
परिश्रम घेतले.
रांजी येथील नैसर्गिक लाख व डिंक संस्थेचे संचालक डॉ के के शर्मा |
कुलगुरू मा डॉ अशोक ढवण |