Saturday, November 16, 2019

वनामकृवित नैसर्गिक लाख व डिंक यावर राष्‍ट्रीय वार्षिक कार्यशाळेचे आयोजन

देशातील नऊ राज्‍यातील शास्‍त्रज्ञांचा सहभाग

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय नैसर्गिक लाख व डिंक काढणी, प्रक्रिया व मुल्‍यवर्धन जोडणी प्रकल्‍प व भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे रांजी येथील भारतीय नैसर्गिक लाख व डिंक संस्‍था यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक 19 नोंव्‍हेबर रोजी अकराव्‍या वार्षिक कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले असुन या कार्यशाळेस रांजी येथील संचालक डॉ के के शर्मा यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असुन अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे राहणार आहेत. लुधियाना येथील प्रकल्‍प सन्‍मवयक डॉ एस के त्‍यागी, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, रांजी येथील डॉ निरंजन प्रसाद आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. सदरिल कार्यशाळेत देशातील नऊ राज्‍यातील शास्‍त्रज्ञ सहभागी होणार असुन ते नैसर्गिक लाख व गवार डिंक या पीकाची काढणी, प्रक्रीया व मुल्‍यवर्धन यावरील संशोधन निष्‍कर्षचे सादरिकरण करणार आहेत तसेच या क्षेत्रातील संशोधनाची पुढील दिशा निश्चित करण्‍यात येणार आहे, अशी माहिती आयोजक अन्‍नतंत्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अरविंद सावते व प्रकल्‍प अन्‍वेषक डॉ राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.