वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाच्या ग्रामीण कृषि
कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत रेशीम संशोधन केंद्रात कार्यरत असलेल्या कृषिकन्यांच्या
वतीने मौजे वझुर येथे दिनांक 22 नोंव्हेंबर रोजी रबी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात
आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ डि एन गोखले हे होते तर
प्रगतशील शेतकरी अॅड गंगाधरराव पवार, विस्तार शिक्षण विभागाचे प्रमुख डॉ राकेश
अहिरे, डॉ सी बी लटपटे, डॉ बैनवाड, श्री डि टी पवार, लक्ष्मण लांडे, माजी सरपंच
श्री लक्ष्मण पवार, पी बी अडसुळ, रमेश पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शनात
प्राचार्य डॉ डि एन गोखले यांनी रबी पीक लागवडीवर माहिती दिली तर डॉ सी बी लटपटे
यांनी रेशीम उद्योग व डॉ बैनवाड यांनी पशुपालनाबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे
प्रास्ताविक डॉ राकेश आहिरे यांनी केले. सुत्रसंचालन कृषिकन्या ऋतुजा वाकणकर हिने
केले तर आभार अर्जना गिमेकर हिने मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृषिकन्या दिप्ती
ओव्हाळ, पुजा माळी, अंकिता मालोदे, शुभांगी राऊत, राणी सोनसळे, प्रियंका सुरूसे, पल्लवी
सुकणीकर, माधुरी माने, शुभांगी भवर, अर्चना मेने, गितांजली कैतळे, रोहिनी कुंढे,
मनीषा कांबळे, जया चोपडे, अश्विनी साठे, श्रध्दा सदावर्ते आदींनी परिश्रम घेतले.
मेळाव्या मौजे वझुर, देऊळगांव दुधाटे, अंगलगाव, धसाडी, पोरवड, मालसोन्ना आदी
गावांतील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.