वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाच्या वतीने ग्रामीण कृषि
कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत अखिल भारतीय समन्वयीत करडई संशोधन प्रकल्प येथे
कार्यरत असलेल्या कृषिकन्यांनी दिनांक 26 नोव्हेबर रोजी मौजे जांब येथे शेतकरी
मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य
डॉ डि एन गोखले हे होते तर प्रगतशील शेतकरी श्री संग्रामभैय्या जामकर, सरपंच श्री
संजय स्वामी, डॉ आर डी आहिरे, डॉ एस बी घुगे, डॉ आर व्ही चव्हाण, डॉ ए जी
बडगुजर, डॉ डी व्ही बैनवाड, डॉ एस पी झाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षीय
भाषणात प्राचार्य डॉ डि एन गोखले यांनी एकात्मिक शेती पध्दतीवर मार्गदर्शन केले
तर डॉ आर डी आहिरे यांनी कृषि विद्यापीठाच्या विस्तार कार्याची माहिती दिली. रबी
हंगामातील पिकांवरील किड व्यवस्थापनावर डॉ आनंद बडगुजर यांनी मार्गदर्शन केले तर
पशुसंवर्धनावर डॉ डी व्ही बैनवाड, शेतीचे अर्थशास्त्रावर डॉ आर व्ही चव्हाण
यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ एस बी घुगे यांनी केले. सुत्रसंचालन
कृषिकन्या सपना दोडे हिने केले तर आभार ऋतुजा भालेराव हिने मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी
दिपाली जाधव, कल्पना आहेर, शुभांगी देशमुख आदींनी परिश्रम घेतले. मेळाव्यास मोठया
संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.