विद्यापीठ विकसित विविध बहुउद्देशीय शेती अवजारांना शेतक-यांची असणा-या मागणीची पुर्तता होऊ शकेल .... कुलगुरू मा डॉ अशोक ढवण
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प पशुशक्तीचा योग्य वापर
योजनेंतर्गत विकसित विविध शेती अवजारे मोठया प्रमाणात शेतकरी बांधवाच्या पसंतीस
पडले असुन ही अवजारे मोठया प्रमाणात उपलब्ध होण्याच्या दृष्टीने उस्मानाबाद
जिल्हयातील मौजे लासीना येथील मे. स्वामी अॅग्रो इप्लीमेन्ट या कंपनीशी व्यावसायिक
सामंजस्य करार दिनांक ११ सप्टेंबर रोजी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्या प्रमुख उपस्थितीत
पार पडला. या वेळी संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, कुलसचिव
श्री रणजित पाटील, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे
प्राचार्य डॉ उदय खोडके, सदरिल यंत्र विकसित करणा-या संशोधन
अभियंता डॉ स्मिता सोलंकी, अपारंपारीक ऊर्जा स्त्रोत
विभागाचे प्रमुख डॉ आर डी रामटेके, कंपनीचे संचालक श्री
कुमार शिवलिंग स्वामी, विद्यापीठ अभियंता श्री गौरीशंकर स्वामी, प्रा डी डी टेकाळे, डॉ मदन पेंडके, श्री अजय वाघमारे आदींची उपस्थिती होती. या योजनेंर्गत संशोधनाच्या
आधारे विकसित केलेले बैलचलित सौर फवारणी यंत्र, गादी वाफा करून
प्लास्टिक अंथरणे यंत्र, काडीकचरा गोळा करणे यंत्र, तीन पासेचे फणासह कोळपे आदीं अवजरांचा व्यावसायिकदृष्टया निर्मिती
करिता हा सामंजस्य करार करण्यात आला.
यावेळी कुलगुरू मा डॉ अशोक
ढवण म्हणाले की, शेतकामाकरिता शेतमजुरांची अनुपलब्धता व
वाढती मजुरी याचा विचार करता शेतीत यांत्रिकीकरणाची आवश्यकता आहे. विद्यापीठने संशोधनाच्या
आधारे अनेक शेती अवजारे व यंत्रे विकसित केली आहेत. विद्यापीठ विकसित विविध बहुउद्देशीय
शेती अवजारांना शेतक-यांचीही पसंती असुन
मोठी मागणी होत असुन ही अवजारे मोठया प्रमाणात उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सदरिल
सामजंस्य करारामुळे ही मागणी पुर्ण होईल. शेतकरी गटाच्या माध्यमातुन शेतकरी
बांधवानी एकत्रित येऊन भाडे तत्वावर ही यंत्रे गाव पातळीवर उपलब्ध करून घेतल्यास
जे छोटे शेतकरी आहेत, तेही याचा लाभ घेऊ शकतील. सदरिल अवजारे
शेतक-यांना योग्य किंमतीत लवकरात लवकर मोठया प्रमाणात उपलब्ध व्हावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली तर संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद
वासकर यांनी अवजरांची गुणवत्ता योग्य रहावी यासाठी उत्पादित कंपनीने विशेष
काळजी घ्यावी असे मत व्यक्त केले.
यावेळी करारावर विद्यापीठाच्या बाजुने संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, डॉ स्मिता सोलंकी आदीसह इतर शास्त्रज्ञांनी तर कंपनीच्या वतीने श्री कुमार शिवलिंग स्वामी यांनी स्वाक्षरी केल्या.
यंत्राबाबत सविस्तर माहिती
बैलचलित सौर ऊर्जा फवारणी यंत्र–हे सौर ऊर्जावर चालत असल्याने प्रदुषणरहित फवारणी यंत्र असुन ६ मी बुमवर एकूण १४ नोझल्स बसविलेले आहेत, एकत्रित ब्रुम प्रवाह ७.० ते ९ लि / मि एवढा आहे. फवारणीसाठी लागणारे मनुष्यबळ, वेळ, पैशाची बचत होते. या यंत्राची कार्यक्षमता प्रती दिवस २.५ ते ४ हेक्टर आहे तर बुमची उंची पिक वाढीनुसार कमी जास्त करता येते व दोन नोझल मधील अंतर पिकाच्या ओळीप्रमाणे कमी जास्त करता येते. विशेषत: सोयाबीन व इतर पिकांची मोठया वाढ झाल्यास शेतात फवारणी करण्यास हे यंत्र उपयुक्त आहे. यंत्राने फळबागेमध्ये उंच झाडावर स्प्रेगनच्या सहाय्याने १५ ते २० फुटापर्यंत फवारणी करता येते. ढगाळ वातावरणात सौर पॅनलवर भारीत झालेल्या बॅटरीव्दारे फवारणी करता येते. पारंपारिक पध्दतीपेक्षा १० पटीने काम देत असुन खर्चात ५० टक्के बचत होते.
बैलचलित धसकडे गोळा करण्याचे अवजार–हे अवचार चालविण्याकरिता एका मजुराची आवश्यकता आहे. या अवजाराच्या साहय्याने धसकटे गोळा करतांना ढेकळे फुटुन जमीन भुसभुसीतव समपातळीत करता येते. या अवजाराने एका दिवसात २.५० ते ३ एकर क्षेत्रावरील धसकटे गोळा करता येतात, यामुळे मजूर कमी लागुन वेळेची व पैशाची बचत होते.
बैलचलित सरी यंत्रासहित तीन पासेचे कोळपे – एक मजुराच्या साहाय्रयाने तीन ओळीतील आंतर मशागतीचे व खत देण्याचे काम एकाचवेळी करणे शक्य असुन एका दिवसात २.५ ते ३ एकर क्षेत्राची कोळपणी व खत देण्याचे काम करता येते. पारंपारिक पध्दतीपेक्षा ३० ते ४० टक्के वेळेत व खर्चात बचत होते. कोळप्याला दोन्ही बाजुस फन बसविण्याची सोय असल्याने गादी वाफेवरील पिकांमध्ये कोळपणी व सोबत स-या मोकळया करता येतात.
बैलचलित गादी वाफा करून प्लास्टिक अंथरणे यंत्र – वरंबा, प्लास्टीक आच्छादन व माती लावणे ही कामे एकाच वेळी करता येतात. या यंत्राव्दारे ९० ते १२० सेंमी रूंदीचा, १० ते १५ सेंमी खोलीचा गादी वाफा तयार करून प्लास्टीक आच्छादन करता येते. या यंत्राव्दारे ०.७० हेक्टर प्रती दिवस क्षेत्रावर गादी तयार करून प्लास्टिक आच्छादन करता येते. पारंपारिक पध्दतीपेक्षा ५० टक्के वेळेत व ४० टक्के खर्चात बचत होईन कामाची प्रत उत्तम राहते.