वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालय व श्री शिवाजी महाविद्यालय, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 14 ते 18 फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रीय छात्रसेनेचे शिबिर श्री शिवाजी महाविद्यालयात येथे आयोजित करण्यात आले असुन दिनांक 15 फेबुवारी रोजी कृषि विद्यापीठातील बीएसपी प्रक्षेत्रावर 148 छात्रसैनिकांचा रायफल फायरींगचा सराव घेण्यात आला. सदर रायफल फायरींग सरावात उत्कृष्ट कामगिरी करणा-या छात्रसैनिकांचा कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कंमाडींग ऑफीसर श्री जी आर के शेषासाई, सुभेदार मेजर बिक्रम सिंग, प्राचार्य डॉ सय्यद ईस्माईल, शिक्षण विभागचे प्रभारी डॉ रणजित चव्हाण आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन लेफ्टनंट डॉ प्रशांत सराफ यांनी केले तर आभार लेफ्टनंट डॉ जयकुमार देशमुख यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेकरिता डॉ अविनाश राठोड, सुनिल कुमार, जगतसिंग, शरद निंबाळकर, श्री बिस्ट, योगेश ठोंबरे, कृष्णा तोंडे, हर्षवर्धन जाधव, ज्ञानेश्वर खटारे, विष्णु राठोड, आदींनी परिश्रम घेतले.