वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील परभणी येथील अन्नतंत्र महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. अनघा सुनील कदम हिची म्हैसुर (कर्नाटक) येथील केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्थेत एम.एस्सी. (फ़ूड टेक्नोलॉजी) पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेशा करिता पात्र ठरली. सन २०२०-२१ वर्षाकरिता या पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरिता घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पातळीवरील प्रवेश पात्रता परिक्षेत तीने यश संपादन केले. म्हैसुर येथील केंद्रीय अन्नतंत्र संशोधन संस्था ही अन्नप्रक्रिया संशोधन क्षेत्रामध्ये देशातील अतिउच्च अग्रगण्य संस्था असुन अन्नतंत्रज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचे या शिक्षण संस्थेत शिक्षणाचे स्वप्न बाळगुन असतात. या निवडीबाबत कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण, प्राचार्य डॉ उदय खोडके, श्री. रविंद्र पतंगे, डाॅ प्रविण घाटगे आदीसह प्राध्यापकवृदांनी तिचे अभिनंदन केले.
Public Relations Officer, Directorate of Extension Education, Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, Parbhani - 431 402 (M.S.) (Maharashtra) INDIA