देश-विदेशातील शास्त्रज्ञ, कृषि उद्योजक, धोरणकर्ते, प्रगतशील शेतकरी, संशोधक विद्यार्थी यांचा सहभाग
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ,
परभणी आणि इंडियन सोसायटी ऑफ अॅग्रिकल्चरल इंजिनिअर्स,
नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने “नेक्स्ट-जेन डिजिटल
कृषीसाठी अभियांत्रिकी नवकल्पना” या विषयावर इंडियन सोसायटी ऑफ अॅवग्रिकल्चरल इंजिनिअर्सची
५८ वे वार्षिक अधिवेशन आणि “कृषी परिवर्तनाकरिता इच्छुक युवकांसाठी कृषी
अभियांत्रिकी शिक्षण” या विषयावर तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे दिनांक १२
ते १४ नोव्हेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन दिनांक १२
नोव्हेंबर रोजी सकाळी १०.०० वाजता सुवर्ण जयंती दीक्षांत सभागृहात होणार आहे. वसंतराव
नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलुगुरू मा. प्रा. (डॉ) इन्द्र मणि हे अध्यक्षस्थान भूषविणार असुन उद्घाटन समारंभास
मुख्य अतिथी म्हणून भारतीय कृषि संशोधन परिषदेचे माजी महासंचालक पद्मभुषण डॉ आर एस
परोडा हे आहेत तर विशेष अतिथी म्हणून भारतीय कृषि संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ
हिमांशु पाठक आणि कृषि परिषदेचे महासंचालक श्री रावसाहेब भागडे (भाप्रसे) आहेत. तसेच
पीडीकेव्ही अकोलाचे कुलगुरू मा डॉ शरद गडाख, महिंद्रा आणि महिंद्रा समूहाच्या शेती साहित्य विभागाचे
अध्यक्ष डॉ. हेमंत सिक्का, टॅफेचे समूहाचे श्री टी आर केशवन, महिको समूहाचे श्री राजेंद्र बारवाले,
आंतरराष्ट्रीय ट्रॅक्टर लि चे उपाध्यक्ष श्री कुमार बिमल, भारतीय
कृषि अभियंता संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ. गजेंद्र सिंह, डॉ. नवाब अली, माजी कुलगुरू डॉ. व्ही.
एम. मायंदे, माजी कुलगुरू डॉ. के.
पी. गोरे, माजी
कुलगुरू (उदयपुर) डॉ. एन.
एस. राठोड, माजी कुलगुरू डॉ. ए.एस. ढवण आदींची विशेष उपस्थिती राहणार आहे.
उदघाटन प्रसंगी कृषि व कृषि अभियांत्रिकी क्षेत्रातील योगदानाबाबत पद्मभुषण डॉ आर
एस परोडा यांना आयएसएई मानद फेलाशीप २०२४ ने गौरविण्यांत येणार आहे.
या परिसंवादाचे आयोजन नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अभियंता
संघटनेचे अध्यक्ष तथा उप महासंचालक कृषि अभियांत्रिकी डॉ. एस एन झा,
संघटनेचे मुख्य सचिव डॉ. पी.के. साहू,
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय
परिषदेचे संयोजक विद्यापीठाचे संचालक शिक्षण डॉ उदय खोडके, संयोजन सचिव डॉ हरीश आवारी, सह संयोजक डॉ. आर. टी रामटेके आणि डॉ. आर जी. भाग्यवंत,
संयोजन सह सचिव डॉ. एम. एस. पेंडके, डॉ. व्ही. के. इंगळे आणि डॉ. डी.डी. टेकाळे यांनी केले आहे.
सदर परिसंवादात कृषी अभियांत्रिकीमधील नाविन्यपूर्ण उपाय
आणि प्रगती यावर चर्चा करण्यासाठी देश-विदेशातील ५०० पेक्षा भारतीय कृषी अनुसंधान
परिषदेचे अधिकारी व शास्त्रज्ञ, देशातील विविध राज्यातील
कृषि विद्यापीठांचे कुलगुरू, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संघटना उद्योगांचे प्रतिष्ठित
प्रतिनिधी, धोरणकर्ते
आणि शास्त्रज्ञ, उद्योजक,
विविध विभागातील मान्यवर, संशोधक विद्यार्थी, कृषि अभियंता सहभागी होणार आहे. अमेरिका,
जर्मनी, जपान, नेपाळ, श्रीलंका, मलेशिया इत्यादी देशातुन ८०० पेक्षा जास्त संशोधन सारांश
प्राप्त झाले आहेत.
दिनांक १२ नोव्हेषबर रोजी "कृषी परिवर्तनासाठी इच्छुक
तरुणांकरिता कृषी अभियांत्रिकी शिक्षण" या विषयावर आयआयटी खरगपूर चे संचालक
डॉ. व्ही. के. तिवारी, माजी
कुलगुरू (उदयपुर) डॉ. एन. एस. राठोड, अमेरिकेतील परडू विद्यापीठाचे डॉ. किंग्स्ले,
नेपाळ येथील शास्त्ररज्ञ डॉ. भिमप्रसाद श्रेष्ठा,
आसीअन असोसिएशानचे डॉ. सय्यद इस्माइल तसेच देश विदेशातील
तज्ञ शास्त्रज्ञ विचार व्यक्त करणार असून दिनांक १४ नोव्हेबर रोजी
"नेक्स्ट-जेन डिजिटल ॲग्रिकल्चर अभियांत्रिकी नवकल्पना" या विषयावर आयआयडी खरगपूर येथील डॉ. मदन झा,
लुधियाना येथील अधिष्ठा्ता डॉ. मनजित सिंग मार्गदर्शन करणार
आहे. दिनांक १३ नोंव्हेबर रोजी चार विषयांतर्गत समांतर पाच मौखीक व पाच पोस्टर सत्र याप्रमाणे एकूण २०
मौखीक व २० पोस्टर सत्राचे नियोजन करण्यातत आले आहे.
परिसंवादात कृषि उद्योजक, शेतकरी व शालेय विद्यार्थ्यां करिता स्वतंत्र सत्राचे आयोजन करण्यात आले असुन शेतकरी चर्चासत्रात नाशिक येथील सहयाद्री शेतकरी उत्पादनक कंपनीचे अध्यक्ष श्री विलास शिंदे यांचे शेतकरी बांधवाकरिता मराठवाडा शेती – संधी व आव्हाने या विषयावर दिनांक १३ नोव्हेबर रोजी दुपारी २.३० वाजता विशेष व्याख्यान होणार आहे. तसेच आधुनिक कृषि अभियांत्रिकी तंत्रज्ञानावर आधारीत कृषि प्रदर्शनीचेही आयोजन करण्यात आले आहे. आधुनिक यांत्रिकीकरणावर उद्योग आधारित स्वतंत्र चर्चा राहणार असुन याबरोबरच कृषि क्षेत्रातील नामवंत उद्योगसमुहाचे उच्चपदस्थ अधिकारी या कार्यक्रमास उपस्थित राहून आधुनिक तंत्रज्ञानाचे सादरीकरण करणार आहेत.
चार चर्चासत्रात पुढील विषयावर होणार विचार मंथन :
परिसंवादाच्या पहिल्या सत्रात कृषी यांत्रिकीकरण आणि
स्वयंचलन यात बियाणे ते बियाणे यांत्रिकीकरण, मशागत आणि ट्रॅक्शन यांत्रिकीकरण, लागवड, पुनर्लावणी,
वनस्पती संरक्षण, कापणी आणि मळणी यंत्रे, मेकॅट्रॉनिक्स, ड्रोन, अल आणि रोबोटिक्ससह सौर उर्जेवर चालणारी उपकरणे,
एर्गोनॉमिक्स आणि मानवी सुरक्षा आदी विषयावर चर्चा होणार
आहे.
दुस-या सत्रात अन्न प्रक्रिया अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान
सत्रामध्येस काढणीनंतरचे अभियांत्रिकी आणि कृषी आणि फळ भाजीपाल पिकांची हाताळणी,
अन्न प्रक्रिया आणि काढणी पश्चात तंत्रज्ञान,
दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्य व्यवसाय, पोषक व मूल्यवर्धित पदार्थ आदी विषयावर तर तिस-या सत्रात
जमीन आणि जल व्यवस्थापन तंत्रज्ञान / मृदा आणि जलसंधारण अभियांत्रिकी यात माती आणि जल अभियांत्रिकी आणि ड्रेनेज
सिस्टम्समधील भौगोलिक तंत्रज्ञान, भूजल वापर आणि इष्टतम वाढ, संवर्धन आणि पाणलोट व्यवस्थापनाद्वारे आधुनिक शेतीसाठी पाणी
संवर्धन शेती, आधुनिक
सिंचन व्यवस्थापन आणि शेतीला नवसंजीवनी देण्यासाठी नवकल्पना,
कृत्रिम बुध्दीठमत्ताध, आयओटी, मशिन लर्गिन, यावर चर्चा होणार आहे. तसेच चौथ्या सत्रात हरित आणि पर्यायी
ऊर्जा तंत्रज्ञान वरील कृषी-पीव्ही आणि सौर उर्जा तंत्रज्ञान,
कृषी आणि उद्योगांमध्ये अक्षय ऊर्जा अनुप्रयोग बायोमास
ऊर्जा, जैवइंधन
उत्पादन तंत्रज्ञान, स्वच्छ
ऊर्जा तंत्रज्ञान, कचरा
/ ऊर्जा संवर्धनातून ऊर्जा निर्मिती, पशु ऊर्जा यावर चर्चा होणार आहे.
कृषि अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन शैक्षणिक प्रणाली यावर देशातील नामवंत शास्त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. याबरोबरच शेतकरी बांधवाकरिता स्वतंत्र चर्चा राहणार असुन आधुनिक तंत्रज्ञानाचे विविध दालने लावण्यात येणार असून विद्यार्थी व शेतकरी ह्यांना उपयुक्त ठरणार आहे. शाश्वत शेतीसाठी पुढील नियोजन आणि अंमलबजावणीसाठी अधिवेशनाची शिफारस राज्य आणि केंद्र सरकारला सादर केली जाणार आहे. परिसंवादात कृषी प्रदर्शन, विविध विषयावर आधारित सत्रांचे आयोजन करण्यात आले असुन आणि शेतकरी - शास्त्रज्ञ - विद्यार्थ्यां संवादाचे आयोजन करण्याात आले आहे. शाश्वत कृषी धोरणांसाठी अधिवेशनातील शिफारशी सरकारला सादर केल्या जातील. सदर परिसंवादासाठी विविध खते, बियाणे, ड्रोन, ट्रक्टर, मशिनरी, ठिबक, तुषार, अन्न प्रक्रिया, सौर, उत्पादन कंपनी तसेच शासकीय, निमशासकीय संस्था, शैक्षणिक संस्था यांचा सहभाग राहणार आहे. सदर परिसंवादाचे थेट प्रक्षेपण https://www.youtube.com/@VNMKV विद्यापीठ युटयुब चॅनेलवर करण्यात येणार आहे.