वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्या कृषि
महाविद्यालयाच्या वतीने गणेश मुर्तीची स्थापना दि 9 सप्टेंबर रोजी करण्यात
आली. विद्यापीठाचे कुलगूरू मा डॉ किशनरावजी गोरे यांच्या हस्ते श्रींच्या मुर्तीचे
पुजन करण्यात आले. या प्रसंगी कृषि महावि़द्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता तथा
प्राचार्य डॉ एन डी पवार, जिमखाना उपाध्यक्ष तथा विभाग प्रमुख डॉ विलास पाटील,
विभाग प्रमुख डॉ बी एम ठोंबरे, विभाग प्रमुख डॉ जी एम वाघमारे, डॉ बी व्ही
आसेवार, डॉ एच व्ही काळपांडे, डॉ खंदारे, प्रा राठोड व विद्यार्थी मोठया संख्येने
उपस्थित होते.
Public Relations Officer, Directorate of Extension Education, Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, Parbhani - 431 402 (M.S.) (Maharashtra) INDIA
Tuesday, September 10, 2013
Saturday, September 7, 2013
मुरुंबा येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्या कृषि महाविद्यालयाच्या ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाच्या अनुषंगाने कृषिकन्यांनी मौजे मुरुंबा येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्रगतशील शेतकरी श्री गोपीनाथराव झाडे हे होते तर प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कोयाळकर व श्री स्वामी विशेष उपस्थिती होती.
याप्रसंगी एकात्मिक किड व्यवस्थापनावर
डॉ. धिरज कदम, तण व्यवस्थापनावर डॉ. ए. एस. जाधव, एकात्मिक रोग व्यवस्थापनावर
प्रा. एस. एल. बडगुजर तसेच रबी ज्वारी, हरबरा लागवड तंत्रज्ञान याविषयावर डॉ. वा.
नि. नारखेडे यांनी शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले. तसेच गावातील ह. भ. म. श्री
दगडु महाराज झाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने
शेतकरी बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामीण कृषि
कार्यानुभव कार्यक्रमाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. जे. व्ही. एकाळे यांनी केले. कार्यक्रमाच्या
यशस्वीतेसाठी कृषिकन्या धनश्री हुडेकर, मंदा किरवले, मिना नाईकवाडे, प्रिया
पवार, कांचन क्षिरसागर, ज्योती बोर्डे, स्वर्णा खंदारे आदिंनी परिश्रम घेतले. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यकमाचे कार्यक्रम सहसमन्वयक तथा
विभाग प्रमुख डॉ. बि. एम. ठोंबरे व प्रभारी डॉ. आर. पी. कदम यांचे मार्गदर्शन लाभले.
गृह विज्ञान महाविद्यालयात व्यक्तिमत्व व शैक्षणिक संपादणुक वृध्दींगत क्लबचे उद् घाटन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठांतर्गत असलेल्या गृह विज्ञान महाविद्यालयाच्या पदवीपुर्व व पदव्युत्तर
विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व व शैक्षणिक संपादणुक वृध्दींगत क्लबची स्थापना
करण्यात आली. या क्लबचे उद्घाटन संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता मा. डॉ विश्वास
शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी विस्तार शिक्षण संचालक डॉ अशोक
ढवण, संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता व
प्राचार्या प्रा विशाला पटनम यांची विशेष उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास घडवण्यासाठी
त्यांच्या अभ्यासक्रमाव्यतीरिक्त या प्रकारच्या नावीण्यपुर्ण उपक्रमांची
जोड देणे आवश्यक असल्याचे मत संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता मा. डॉ विश्वास
शिंदे यांनी व्यक्त केले. याबाबत त्यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा
विशाला पटनम यांचे अभिनंदन केले. तसेच विस्तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण व
संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर यांनी विद्यार्थ्यांनी स्वत:ची जीवन कौशल्ये
वृध्दींगत करणे ही काळाची गरज आहे असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमात महाविद्यालयाच्या विद्यार्थी
संसदेच्या नुतन सदस्यांचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच
महाविद्यालयाच्यावतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धतील विजेत्यांना प्रशस्तीपत्र
प्रदान करण्यात आले.
पदवीपुर्व विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व
व शैक्षणिक संपादणुक वृध्दींगत तथा अध्ययन गती मंदित्वाना न्याय देण्यासाठी
विशेष उपचारात्मक वर्गात अॅड सुवर्णमाला गायकवाड यांनी कौटुंबिक हिंसाचार - कारणे
व निवारण, मुंबईच्या सामाजिक कार्यकर्त्या
श्रीमती संगीता सोळंके यांनी ग्रामीण महिलांच्या आर्थिक सबलीकरणामध्ये युवकांचा
सहभाग व निरामय स्वास्थासाठी योगा तर विद्यापीठाच्या महिला तक्रार निवारण
समितीच्या सद्स्या श्रीमती आशा ढालकरी यांनी उद्योजकतेव्दारे स्वत:च विकास या
विषयावर मार्गदर्शन केले.
शिक्षक दिनाचे औचित्य साधुन विद्यार्थ्यानी
सर्व शिक्षकांचे पुष्पगुच्छ देवुन कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे आयोजन
जिमखाना उपाध्यक्षा तथा संशोधिका डॉ सुनिता काळे व विद्यार्थी संसद सदस्य यांनी
केले.
मार्गदर्शन करतांना मुंबईच्या सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती संगीता सोळंके, व्यासपीठावर अॅड सुवर्णमाला गायकवाड, महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा विशाला पटनम, जिमखाना उपाध्यक्षा डॉ सुनिता काळे आदी |
मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त रबी पीक शेतकरी मेळाव्याचे आयोजन
मराठवाडा
मुक्ती दिनानिमित्त दिनांक 17 सप्टेंबर 2013 रोजी सकाळी 11.00 वाजता कृषि
महाविद्यालय, परभणीच्या सभागृहामध्ये रबी पीक शेतकरी मेळावा वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या
संयुक्त विद्यमाने आयोजीत करण्यात आला असुन विद्यापीठाचे मा. कुलगूरू डॉ के पी
गोरे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. मेळाव्यात चर्चासत्राचे व कृषि प्रदर्शनाचे
आयोजन करण्यात आले असुन कृषि विद्यापीठाचे शास्त्रज्ञ रबी पीक लागवड
तंत्रज्ञानावर मार्गदर्शन करणार आहे.
सर्व
शेतकरी बांधवांनी सदरील मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन
विस्तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण व मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. राकेश
आहिरे यांनी केले आहे.
Friday, September 6, 2013
जांब येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठांतर्गत असलेल्या कृषि महाविद्यालयाच्या ग्रामीण कृषि कार्यानुभव
कार्यक्रमाच्या अनुषंगाने कृषिदुतांनी मौजे जांब येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन
करण्यात आले होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्रगतशील शेतकरी श्री
बाळासाहेब रेंगे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन प्रगतशील शेतकरी साहेबराव
काकडे, विस्तार विभागाचे विभाग प्रमुख
डॉ. बि. एम. ठोंबरे यांची उपस्थिती होती. तसेच अ.भा.स.करडई संशोधन प्रकल्पाचे
प्रभारी अधिकारी डॉ. एस. बी. घुगे, पारवा येथील सरपंच रामराव काळे, कृषि सहाय्यक
श्री ए. एस. जाधव, बाळासाहेब रेंगे, सय्यद इसाक सय्यद चॉंद्, राजेभाऊ रेंगे,
रामराव मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे
प्रास्ताविक ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाचे सहसमन्वयक तथा विस्तार
विभागाचे विभाग प्रमुख डॉ. बि. एम. ठोंबरे यांनी केले. याप्रसंगी एकात्मिक रोग व्यवस्थापनावर
डॉ. व्ही. एम. घोळवे, एकात्मिक किड व्यवस्थापनावर डॉ. डि. आर. कदम, तण व्यवस्थापनावर
डॉ. ए.एस.जाधव, संत्रा लागवड तंत्रज्ञानावर डॉ. डि. एम. नाईक तर कापुस लागवड
तंत्रज्ञानावर श्री प्रा. एस. एस. सोळंके यांनी शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले.
या मेळाव्यास परीसरातील शेतकरी मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कृषिदुत श्री मस्के व भोगल यांनी केले तर आभार प्रदर्शन
डॉ. एस. व्ही. पवार यांनी केले.
मेळावा यशस्वीतेसाठी कृषिदुत काटे, मुंगीलवार, लांडे, बरकडे, खटींग, कोलते, काळे, गुंजाळ, दांगडे, धाटबळे, देटवे, अवकाळे, भंडारे, लक्ष्मण कुमार, भोकरे, निशांत कुमार आदीनी परिश्रम घेतले. सदरील मेळाव्याच्या यशस्तीतेसाठी ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यकमाचे प्रभारी डॉ. आर. पी. कदम व कार्यक्रम अधिकारी प्रा. डि. व्ही. बैनवाड यांचे मार्गदर्शन लाभले.
Thursday, September 5, 2013
कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या रासेयोच्या स्वयंसेवकाचा नेत्रदान जनजागृती पदयात्रेत उत्स्फुर्त सहभाग
परभणी येथे 28 वा नेत्रदान पंधरवाडा निमित्त जनसामान्यात नेत्रदानाबददल जनजागृती करीता पदयात्रेचे आयोजन जिल्हा रूग्णालयाच्या वतीने करण्यात आले होते. या पदयात्रेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत असलेल्या कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रिय सेवा योजनेच्या स्वयंसेवकानी सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ उदय खोडके यांच्या मार्गदर्शनाखाली उत्स्फुर्त सहभाग नोंदवीला. या पदयात्रेच्या समारोप प्रसंगी जिल्हाधिकारी मा श्री एस पी सिंह यांनी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला. पदयात्रेत जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मित्रगोत्री, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ एकनाथ माले, जिल्हा माहिती अधिकारी श्री राजेंद्र सरग, डॉ संजय रोडगे, डॉ सालेहा कौसर, डॉ अर्चना गोरे, कार्यक्रमाधिकारी प्रा रविंद्र शिंदे, प्रा संजय पवार व स्वयंसेवक मोठया संख्येने उपस्थित होते.
Wednesday, September 4, 2013
हवामान बदलानुरूप राष्ट्रीय कृषि उपक्रमातंर्गत शास्त्राज्ञ – शेतकरी – विद्यार्थी तांत्रिक सुसंवाद कार्यक्रम
पीक उत्पादनाच्या आधुनिक
तंत्रज्ञानाचा वापर करून कोरडवाहु शेतीत शाश्वतता आणता येते. पावसाचा खंड असल्यास
शेततळयातील पाण्याचा उपयोग संरक्षित सिंचनासाठी करावा असे आवाहन वंसतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ किशनराव गोरे यांनी केले. विद्यापीठातील
अखिल भारतीय समनवयीत कोरडवाहु शेती संशोधन केंद्राच्या वतीने हवामान बदलानुरूप
राष्ट्रीय कृषि उपक्रमातंर्गत दि 04 सप्टेंबर रोजी शास्त्रज्ञ – शेतकरी –
विद्यार्थी तांत्रिक सुसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या कार्यक्रमास संशोधन संचालक
डॉ दत्तप्रसाद वासकर, परभणीच्या कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता तथा
प्राचार्य डॉ एन डी पवार व मुख्यशास्त्रज्ञ डॉ सु. भा. चौलवार उपस्थित होते.
मा. कुलगूरू पुढे म्हणाले
की, कोरडवाहु शेतक-यांनी काटेकोर शेती पध्दतीचा अवलंब करावा म्हणजेच योग्य शेती
निविष्ठाचा योग्य वेळी, योग्य प्रमाणात उपयोग करावा तसेच एकात्मिक पीक व्यवस्थापन
करावे. प्रत्येक शेतकरी हा शास्त्रज्ञ आहे. शेतकरी व कृषि शास्त्रज्ञ यांच्या
विचारांची देवाणघेवाण सतत होणे गरजेचे आहे.
संशोधन संचालक डॉ वासकर
यांनी कोरडवाहु शेतक-यांनी पांरपारिक पिकासोबत सिताफळ सारख्या फळझाडांची लागवड
करून त्यावर आधारित मुल्यवर्धीत पदार्थ निमितीसाठी प्रयत्न करावेत असा सल्ला
दिला. तसेच महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ एन डी पवार यांनी
ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाच्या कृषिकन्यानी शेतक-यांशी समन्वय साधुन
कृषि तंत्रज्ञानाचा प्रसार करावा असे प्रतिपादन केले.
डॉ आनंद गोरे यांनी पीक उत्पादन
तंत्रज्ञानाबददल तर प्रा मदन पेंडके यांनी मुलस्थानी जलसंधारण व कोरडवाहु शेती
संशोधन केंद्राने विकसीत केलेल्या तंत्रज्ञानाची माहिती शेतक-यांना दिली.
हवामान बदलानुरूप
परिस्थितीत विविध पिके व त्याचा अभ्यास करण्याच्या दृष्ट्रिने हा कार्यक्रम
आयोजित करण्यात आला होता. विशेष बाब म्हणचे या कार्यक्रमात बाभुळगांवचे शेतकरी,
ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाच्या कृषिकन्यानी व विद्यापीठातील शास्त्रज्ञ
याचा मोठया प्रमाणात सहभाग होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य शास्त्रज्ञ डॉ
सु भ चौलवार यांनी केले. डॉ पपीता गौरखेडे यांनी सुत्रसंचालन तर आभार प्रदर्शन डॉ
मेघा सुर्यवंशी यांनी केले. प्रा सुनिता पवार यांनी ग्रामीण कृषि कार्यानुभव
कार्यक्रमाची माहिती दिली. सर्व शेतक-यांना कोरडवाहु शेती तंत्रज्ञान बाबतची
माहिती पुस्तिका व विद्यापीठ कृषि दैनंदिनी 2013 देण्यात आली.
हया कार्यक्रमास ग्रामीण
कृषि कार्यानुभव कार्यक्रम समन्वयक डॉ बी एम ठोंबरे, विविध विभागाचे विभाग
प्रमुख, अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी
श्री माणिक समिंद्रे, श्री शेळके, श्री सयद, कु सारीका नारळे व कृषिकन्यांनी
परिश्रम घेतले.
Subscribe to:
Posts (Atom)