Saturday, September 7, 2013

मुरुंबा येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या कृषि महाविद्यालयाच्‍या ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाच्‍या अनुषंगाने कृषिकन्‍यांनी मौजे मुरुंबा येथे शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते. या मेळाव्‍याच्‍या अध्‍यक्षस्‍थानी प्रगतशील शेतकरी श्री गोपीनाथराव झाडे हे होते तर प्राथमिक शाळेच्‍या मुख्‍याध्‍यापिका सौ. कोयाळकर व श्री स्‍वामी विशेष उपस्थिती होती.  
याप्रसंगी एकात्मिक किड व्‍यवस्‍थापनावर डॉ. धिरज कदम, तण व्‍यवस्‍थापनावर डॉ. ए. एस. जाधव, एकात्मिक रोग व्‍यवस्‍थापनावर प्रा. एस. एल. बडगुजर तसेच रबी ज्‍वारी, हरबरा लागवड तंत्रज्ञान याविषयावर डॉ. वा. नि. नारखेडे यांनी शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले. तसेच गावातील ह. भ. म. श्री दगडु महाराज झाडे यांनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले. या कार्यक्रमास मोठ्या संख्‍येने शेतकरी बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. जे. व्‍ही. एकाळे यांनी केले. कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेसाठी कृषिकन्‍या धनश्री हुडेकर, मंदा किरवले, मिना नाईकवाडे, प्रिया पवार, कांचन क्षिरसागर, ज्‍योती बोर्डे, स्‍वर्णा खंदारे आदिंनी परिश्रम घेतले. मेळाव्‍याच्‍या यशस्‍वीतेसाठी ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यकमाचे कार्यक्रम सहसमन्‍वयक तथा विभाग प्रमुख डॉ. बि. एम. ठोंबरे व प्रभारी डॉ. आर. पी. कदम यांचे मार्गदर्शन लाभले.