Wednesday, September 4, 2013

हवामान बदलानुरूप राष्ट्रीय कृषि उपक्रमातंर्गत शास्त्राज्ञ – शेतकरी – विद्यार्थी तांत्रिक सुसंवाद कार्यक्रम

विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ किशनराव गोरे मार्गदर्शन करतांना, व्यासपीठावर संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, परभणीच्‍या कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्य डॉ एन डी पवार व मुख्‍यशास्‍त्रज्ञ डॉ सु. भा. चौलवार 

विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ किशनराव गोरे यांच्या हस्ते शेतक-यांना कोरडवाहु शेती तंत्रज्ञान माहिती पुस्तिका व विद्यापीठ कृषि दैनंदिनी 2013 वाटप करतांना व्यासपीठावर संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, परभणीच्‍या कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्य डॉ एन डी पवार व मुख्‍यशास्‍त्रज्ञ डॉ सु. भा. चौलवार


   पीक उत्‍पादनाच्‍या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कोरडवाहु शेतीत शाश्‍वतता आणता येते. पावसाचा खंड असल्‍यास शेततळयातील पाण्‍याचा उपयोग संरक्षित सिंचनासाठी करावा असे आवाहन वंसतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ किशनराव गोरे यांनी केले. विद्यापीठातील अखिल भारतीय समनवयीत कोरडवाहु शेती संशोधन केंद्राच्‍या वतीने हवामान बदलानुरूप राष्‍ट्रीय कृषि उपक्रमातंर्गत दि 04 सप्‍टेंबर रोजी शास्‍त्रज्ञ – शेतकरी – विद्यार्थी तांत्रिक सुसंवाद कार्यक्रम आयोजित करण्‍यात आला होता त्‍याप्रसंगी कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानावरून ते बोलत होते. या कार्यक्रमास संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, परभणीच्‍या कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्य डॉ एन डी पवार व मुख्‍यशास्‍त्रज्ञ डॉ सु. भा. चौलवार उपस्थित होते.
   मा. कुलगूरू पुढे म्‍हणाले की, कोरडवाहु शेतक-यांनी काटेकोर शेती पध्‍दतीचा अवलंब करावा म्‍हणजेच योग्‍य शेती निविष्‍ठाचा योग्‍य वेळी, योग्‍य प्रमाणात उपयोग करावा तसेच एकात्मिक पीक व्‍यवस्‍थापन करावे. प्रत्‍येक शेतकरी हा शास्‍त्रज्ञ आहे. शेतकरी व कृषि शास्‍त्रज्ञ यांच्‍या विचारांची देवाणघेवाण सतत होणे गरजेचे आहे.
   संशोधन संचालक डॉ वासकर यांनी कोरडवाहु शेतक-यांनी पांरपारिक पिकासोबत सिताफळ सारख्‍या फळझाडांची लागवड करून त्‍यावर आधारित मुल्‍यवर्धीत पदार्थ निमितीसाठी प्रयत्‍न करावेत असा सल्‍ला दिला. तसेच महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्य डॉ एन डी पवार यांनी ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाच्‍या कृषिकन्‍यानी शेतक-यांशी समन्‍वय साधुन कृषि तंत्रज्ञानाचा प्रसार करावा असे प्रतिपादन केले.
   डॉ आनंद गोरे यांनी पीक उत्‍पादन तंत्रज्ञानाबददल तर प्रा मदन पेंडके यांनी मुलस्‍थानी जलसंधारण व कोरडवाहु शेती संशोधन केंद्राने विकसीत केलेल्‍या तंत्रज्ञानाची माहिती शेतक-यांना दिली. 
   हवामान बदलानुरूप परिस्थितीत विविध पिके व त्‍याचा अभ्‍यास करण्‍याच्‍या दृष्ट्रिने हा कार्यक्रम आयोजित करण्‍यात आला होता. विशेष बाब म्‍हणचे या कार्यक्रमात बाभुळगांवचे शेतकरी, ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाच्‍या कृषिकन्‍यानी व विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ याचा मोठया प्रमाणात सहभाग होता. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ सु भ चौलवार यांनी केले. डॉ पपीता गौरखेडे यांनी सुत्रसंचालन तर आभार प्रदर्शन डॉ मेघा सुर्यवंशी यांनी केले. प्रा सुनिता पवार यांनी ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाची माहिती दिली. सर्व शेतक-यांना कोरडवाहु शेती तंत्रज्ञान बाबतची माहिती पुस्तिका व विद्यापीठ कृषि दैनंदिनी 2013 देण्‍यात आली.
   हया कार्यक्रमास ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम समन्‍वयक डॉ बी एम ठोंबरे, विविध विभागाचे विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी श्री माणिक समिंद्रे, श्री शेळके, श्री सयद, कु सारीका नारळे व कृषिकन्‍यांनी परिश्रम घेतले.