वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातंर्गत असलेल्या कृषी अभियांत्रिकी व
तंत्रज्ञान महाविद्यालयात दि. २३ नोव्हेंबर ते २ डिसेम्बर २०१५ दरम्यान भारतीय कृषी
अनुसंधान परिषद, नवी दिल्ली पुरस्कृत सुक्ष्मसिंचन व विद्राव्य खत व्यवस्थापन या
विषयावर राष्ट्रीय लघुप्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजित करण्यात असुन प्रशिक्षण
कार्यक्रमाचे उद्घाटन दि. २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
कुलगुरू मा डॉ बी. व्यंकटेश्वरलू राहणार असुन प्रमुख पाहुणे म्हणून अकोला येथील
डॉ पंजाबराव कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा डॉ व्ही. एम. मायंदे हे राहणार
आहेत. शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ बी. बी. भोसले, कुलसचिव
डॉ दिनकर जाधव यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. सदरिल प्रशिक्षण विषय संचालक तथा
सहयोगी अधिष्ठाता डॉ उदय खोडके यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असुन यशस्वीतेसाठी
कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक व कर्मचारी परिश्रम
घेत आहेत. प्रशिक्षणात देशातील विविध कृषी विद्यापीठे व कृषि संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञ, प्राध्यापक
व तंत्रज्ञ सहभागी होणार आहेत. सद्य परिस्थितीत पाण्याच्या दुर्भीक्षामुळे व विकासासाठी पाण्याची विविध क्षेत्रातील मागणी
वाढल्यामुळे कृषी क्षेत्रात सिंचन कार्यक्षमता वाढविणे क्रमप्राप्त झाले असुन आधुनिक सिंचन प्रणाली, स्वयंचलित सिंचन पध्दती, सुक्ष्म सिंचना व्दारे
पाणी व खतांची कार्यक्षमता वाढविणे, विविध पिकांसाठी पर्यावरण अनुकूल पाणी व खत
व्यवस्थापन आदी विविध विषयावर सदरील प्रशिक्षणात चर्चा, प्रात्यक्षिके, प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात
आले आहे. तसेच पाणी व खतांचे उत्तम व्यवस्थापन करून दर्जेदार पिक उत्पादनात वाढ व
उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करून शाश्वत पिक उत्पादन यावर विशेष भर देण्यात
येणार आहे. प्रशिक्षणात विद्यापीठातील व इतर संस्थेतील विविध पैलूवर मार्गदर्शन व चर्चा
करतील.