Tuesday, June 7, 2016

वनामकृविच्‍या २१ शिफारशींना संयुक्‍त कृषि संशोधन व विकास समितीची मान्‍यता

पिकांंचे दोन वाणासह चार कृषी यंत्राचे प्रसारण व १५ पीक उत्पादन तंत्रज्ञानावर आधारित शिफारसींंचा समावेश

महाराष्‍ट्रातील चारही कृषी विद्यापीठाची संयुक्त कृषि संंशोधन आणि विकास समितीची ४४ वी बैठक अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ या ठिकाणी दिनांक २८ ते ३० मे दरम्यान संपन्न झाली. सदरिल बैठकी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे दोन पिक वाणांचे, चार कृषी यंत्राचे प्रसारण आणि १५ पीक उत्पादन तंत्रज्ञानावर आधारित अशा २१ शिफारशी पारित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर व संशोधन सहसंचालक डॉ. दिगंबर पेरके यांनी दिली असुन त्यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

वनामकृविच्‍या दोन पिकाच्‍या वाणास मान्‍यता
() सोयाबीनचा एमएयुएस ६१२ वाणास मान्‍यता


एमएयुएस ६१२ हा सोयाबीनचा वाण अधिक उत्पादकक्षम असून चक्रीभुंगा, खोडमाशीशेंगा पोखरणारी अळी या किडींना तसेच अल्टरनेरीया पानावरील ठिपके व शेंग करपा या रोगांना सहनशील असल्याने या वाणाची महाराष्ट्रात लागवडीकरिता शिफारस करण्यात आली.







() तुरीच्‍या बीडीएन ७१६ वाणास मान्‍यता


तुर पिकाच्या बीडीएन ७१६ या वाणांने नियंत्रक वाण बीडीएन ७०८, बीडीएन ७११, एकेटी ८८११, विपुला आणि राजेशवरीपेक्षा अनुक्रमे २४.७१, ४०.७७, २५.८२, २४.९७ आणि १३.१९ टक्के पेक्षा जास्त उत्पादन दिल्याचे आढळुन आले अुसन १६५-१७० दिवसात तयार होणा-या, मर व वांझ रोग प्रतिबंधक व उत्तम प्रतीची डाळ शिजवण्याची गुणवत्ता असल्याने या वाणाची महाराष्ट्रात खरीप हंगामासाठी शिफारस करण्यात आली.





वनामकृविच्‍या चार कृषि यंत्रे प्रसारण
() वनामकृवि बैलचलित चक्राकार पद्धतीची परीवलन यंत्रणा
वनामकृवि विकसीत बैलचलित चक्राकार पध्‍दतीच्या परीवलन यंत्रणेची एक अश्‍वशक्तीचे धान्य उफणनी यंत्र, धान्य पॉलिशींग यंत्र, मिरची कांडप यंत्र व शेवया तयार करण्याचे यंत्र चालविण्यासाठी शिफारस करण्यात आली.
यंत्रणेची वैशिष्टे ही यंत्रणा एक अश्‍वशक्तीचे विविध कृषि प्रक्रिया यंत्र बैलाच्या साहाय्याने चालविण्यास उपयुक्त असुन बैलाचा रिकाम्या वेळेत उपयोग होतो. सदरिल यंत्रणा बचत गट व लघुउद्योग यांना फायदेशीर असुन याची क्षमता धान्य उफणनी व प्रतवारीसाठी प्रती तास ३४४.६६ कि. ग्रॅ., दाळ पॉलि करण्‍यासाठी २६३. कि.ग्रॅ., मिरची कांडप . कि.ग्रॅ. व  शेवया तयार करण्‍यासाठी .८३ कि.ग्रॅ. इतकी आहे.



() वनामकृवि मनुष्यचलीत बहुउद्देशीय कवच काढणी यंत्र


वनामकृवि विकसीत बहुउद्देशीय कवच काढणी यंत्राची बीबा, सुपारी, बदाम व आक्रोड यांचे कवच काढण्यासाठी शिफारस करण्यात आली.
यंत्राची वैशिष्टे - यंत्रासाठी विजेची गरज भासत नाही, विविध कवचधारी फळांचे कवच फोडण्यास होणारा त्रास कमी होतो तर बचत गटासाठी किंवा लघु उद्योगास फायदेशी आहे.











() इंजिन चलित खड्डे पाडण्याचे यंत्र


वनामकृवि विकसीत स्थिर सांगाडा असलेले इंजिन चलित खड्डे पाडणा-या यंत्राची विविध आकाराचे खड्डे पाडण्यासाठी शिफारस मान्‍य करण्यात आली.
यंत्राचे वैशिष्टे - विविध आकारांचे खड्डे पाडण्याकरीता उपयुक्तकमी इंधन खपत असुन यंत्राची क्षमता प्रती तास ४० खड्डे (खोली मीटर) अशी आहे.







() विद्युतचलीत भाजणी यंत्र


वनामकृवि विकसीत किलो क्षमतेचे उच्च तापमान व कमी वेळ या तत्वावर चालणा-या विद्युतचलीत भाजणी यंत्राची आणि प्रक्रियेची शिफारस भाजलेले सोयानटस् बनविण्यासाठी करण्यात येते. (प्रक्रिया : सोयाबीन एक तास भिजवीणे, दोन तास सावलीमध्ये सुकविणे व त्यानंतर १३० डिग्री से. तापमानावर . मिनीटे भाजणे)











पीक उत्पादन तंत्रज्ञानावर आधारीत १५ शिफारसींना मान्‍यता

कृषि विद्या
() मराठवाडयातील मध्यम प्रतीच्या जमिनीवर कोरडवाहू कपाशीच्या सघन लागवडीसाठी एनएच-६१५, एनएच-६३५ व सुरज या अमेरीकन सरळ वाणांची ६० x १० सें.मी. अंतरावर (.६६ लाख झाडे प्रति हेक्टर) लागवड करण्याची शिफारस करण्यात येत आहे.

मृद विज्ञान
() मराठवाडयातील जस्ताची कमतरता असलेल्या खोल काळ्या जमिनीसाठी रब्बी हंगामातील हरभरा पिकाच्या अधिक उत्पादनासाठी आर्थिक फायद्यासाठी शिफारशीत खत मात्रेसोबत (२५:५० किलो नत्र व स्फुरद) पाला ३० किलो प्रती हे. व २५ किलो जस्त सल्फेट देण्याची शिफारस करण्यात येते.

(३) मराठवाडा विभागातील चुनखडीयुक्त जमिनीमध्ये सुक्ष्म अन्नद्रव्याचे व्यवस्थापनासाठी मोसंबीचे अधिक उत्पादन व फळांची प्रत सुधारण्यासाठी आणि आर्थिक फायद्यासाठी, मोसंबीच्या फळ बागेस ८०० : ४०० : ४०० ग्रॅम / झाड नत्र, स्फुरद व पाला खत मात्रा आवर्तनात ठिंबक सिंचनाद्वारे (सोबतच्या तक्त्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे) अधिक १५ किलो गांडुळखत आणि १०० ग्रॅम ट्रायकोडर्मा जमिनीतून बहार धरतेवेळी अधिक मिली प्रत्येकी अॅझोटोबॅक्टोर आणि पीएसबी प्रती झाड तसेच चिलेटेड जस्त, लोह आणि बोरान यांच्या अनुक्रमे ., .आणि .२० टक्के या सुक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी प्रत्येक महिन्याला (जून ते जानेवारी) करण्याची शिफारस करण्यात येते.       
खते देण्याचा कालावधी
खते देण्याचा महिना
खताची मात्रा (८००:४००:४०० नत्र, स्फुरद, पाला) प्रति झाड (ग्राम)
जीवाणु खते विद्राव्य अॅझोटोबॅक्टर व पीएसबी
नत्र
स्फुरद
पाला
विद्राव्य खते १९:१९:१९
युरीया
पहिला
जून
१००
१००
१००
५२०
-
मिली प्रत्येकी
दुसरा
जुलै
१००
२५
२५
१३०
१६५
मिली प्रत्येकी
तिसरा
ऑगस्ट
१००
५०
५०
२६०
११०
मिली प्रत्येकी
चौथा
सप्टेंबर
१००
२५
२५
१३०
१६५
मिली प्रत्येकी
पाचवा
ऑक्टोबर
१००
५०
५०
२६०
११०
मिली प्रत्येकी
सहावा
नोव्हेंबर
१००
२५
२५
१३०
१६५
मिली प्रत्येकी
सातवा
डिसेंबर
१००
७५
७५
३९०
५५
मिली प्रत्येकी
आठवा
जानेवारी
१००
५०
५०
२६०
११०
मिली प्रत्येकी

() अधिक कापुस उत्पादन, आर्थिक फायदा जमिनीचे गुणधर्म सुधारण्यासाठी . लीटर द्रवरूप ट्रायकोडर्मा व्हिरीडी ही जस्त विद्राव्य करणारी बुरशी १००० लीटर पाण्यात मिसळुन बी टी कापसाच्या मुळाजवळ लागवडीनंतर ३० दिवसाच्या आत शिफारशीत खत मात्रेसह देण्याची शिफारस मराठवाडा विभागासाठी करण्यात येते.

पीक संरक्षण
(५) तुरीवरील एकात्मिक कीड व्यवस्थापनाची खालीलप्रमाणे शिफारस करण्यात येत आहे.
. स्वच्छता मोहीम व उन्हाळयात खोल नांगरट करावी.
. कीड-रोगास प्रतीकारक्षम जास्त उत्पन्न देणारे वाण निवडावे उदा. बीएसएमआर ७३६
. शेंगा पोखरणा-या अळीच्या सर्वेक्षणासाठी कामगंध सापळे प्रती हेक्टर शेतात लावावे.
. पक्षी थांबे ५० प्रती हेक्टर लावावे.
. मोठया अळया हाताने वेचून त्यांचा बंदोबस्त करावा.
. पीक ५० टक्के फुलो-यात आल्यावर अॅझाडीराक्टीन १०००० पीपीएम १० मिली प्रती १०  लीटर पाण्यात फवारावे.
. शेंगा पोखरणारी अळी आर्थिक नुकसान संकेत पातळी ओलांडताच एचएएनपीव्ही २५० एलई / हेक्टर फवारावे.
. शेंगा पोखरणा-या अळी साठी इमामेक्टीन बेन्झोएट एस जी ग्रॅम / १० लीटर पाण्यात फवारावे.
. शेंगा माशीसाठी मोनोक्रोटोफॉस ३६ एस एल १२. मिली / १० लीटर पाण्यात फवारावे.

अन्न तंत्रज्ञान
() साखरेऐवजी मध वापरून उत्तम प्रतीची आवळा कॅन्डी तयार करण्याची शिफारस करण्यात येत आहे.
() सेलम हळदकंदाच्या किसामध्ये १५ % अद्रकचा किस व २० % लिंबाचा रस वापरून उत्तम प्रतीचे लोणचे तयार करण्याची शिफारस करण्यात येते.

गृहविज्ञान
() आहारात मक्याचा वापर वाढविण्यासाठी शे, लाडु व खस्ता असे फराळाचे पदार्थ तयार करतांना १०० टक्के मक्याच्या पीठाचा वापर करावा अशी शिफारस करण्यात येते.
(९) सात ते नऊ वर्षाच्या मुलांचे वजन, रक्तातील हिमोग्लोबिनच्या आणि प्रथिनांचे प्रमाण वाढविण्यासाठी वनामकृवि विकसित प्रथीन समृद्ध मिश्र डाळीच्या शेवाचे सोयाबीन, मुग डाळ, हरभरा डाळ आणि उडीद डाळ मिश्र २०:१०:: दररोज ५० ग्रॅम सेवन करण्याची शिफारस करण्यात येते.
(१०) विकासात्मक दोष असलेल्या बालकांचे मुल्यमापन करून त्यांचा उच्चतम विकास साधण्याकरीता हया बालकांच्या कुटुंबांना शास्त्रोक्त मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्राच्या ठिकाणी शासकीय, शासकीय संस्था, शाळा, महाविद्यालय तथा दवाखाना येथे परिपुर्ण बाल मार्गदर्शन व कौटुंबिक समुपदेन चिकित्सालय स्थापन करण्याची शिफारस करण्यात येत आहे.

कृषि अभियांत्रिकी
(११) नांदेड, हिंगोली, लातूर आणि औरंगाबाद जिल्ह्रांतील भुपृष्ठीय निचरा-प्रणालीचे आरेखन करण्याकरीता वनामकृवि विकसीत तालुकानिहाय निचरा गुणांकाचा वापर करण्याची शिफारस करण्यात येत आहे.
(१२) ज्या कुपनलिकेच्या जवळ पावसाचे वाहते पाणी एकत्रित जमा होते, त्या ठिकाणी मराठवाडयामध्ये कुपनलीकेत भुजल पुनर्भरण करण्याकरीता पुढील तपशील असलेली वनामकृवि सुधारीत कुपनलिका पुनर्भरण यंत्रणावापरण्याची शिफारस करण्यात येते.
- कुपनलिकेची सभोवताली . मी व्यासाचा, . मी. खोल खड्डा तयार करून केसींग पाईपला खालुन ५० सें.मी. उंचीपर्यंत मी.मी. व्यासाची छिद्रे पाडून त्यावर नायलॉन जाळीचे दोन आवरण घालावे.
- गाळण यंत्रणेत दोन थरानंतर नायलॉन जाळी टाकावी तसेच गाळण यंत्रणेच्या वरच्या भागात . मी. व्यासाचे व २० सें.मी. उंचीच्या दोन सिमेंट रिंग टाकाव्यात.         
अ.क्र.
गाळण साहित्य
खोली (सें.मी.)
जाडी (मि.मी.)
मोठे दगड
५०
६० ते ८०
छोटे दगड
५०
२० ते ३०
जाड वाळू/रेती
३०
१० ते १५
बारीक वाळू/रेती
२०
२ ते ३

जैवतंत्रज्ञान 
(१३) फ्लुरोसंस लेबेल्ड तंत्रावर आधारित वनामकृवि झापडिटेक्टसंचाचा वापर डाळिंब पिकामधील तेलकट डाग (झान्थोमोनास अक्झोनोपोडीस पी.वी.पुनिकी) या रोगाचे जनुकीय नमुन्याद्वारे जलद, विश्‍वासार्ह अचुक व सहज पद्धतीने निदान करण्यासाठी शिफारस करण्यात येत आहे.

कृषि अर्थशास्त्र
(१४) कृषी मालाच्या केंन्द्रामार्फत जाहीर केलेल्या किमान आधारभूत किंमती आणि महाराष्ट्र राज्याच्या पीक उत्पादन योजनेच्या माहितीच्या आधारावर शिफारशीत केलेल्या किंमती कमी आहेत त्या पिकांसाठी ही तफावत कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रोत्साहन अनुदान देण्याची शिफारस करण्यात येत आहे.

विस्तार शिक्षण
(१५) हुमणी किडींच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी जैविक (हेक्टरी १० किलो मेटारायझीयम अॅनिसोप्ली जमिनीतून वापरावा). रासायनिक (फिप्रोनिल ४० टक्के अधिक इमिडाक्लोप्रीड ४० टक्के हे. मिश्र किटकना ग्रॅम १० लीटर पाण्यात मिसळून हुमणीग्रस्त झाडाभोवती आळवणी करावी. तसेच हेक्टरी फोरेट १० टक्के दाणेदार हे कीटकना२५ किलो किंवा कोर्बोफ्युरॉन सी जी ३३ किलो ओल्या जमिनीत मिसळावे) व सामुहिक गावस्तरावर पीक संरक्षणाबद्दल कृषी विभाग, कृषी विज्ञान केंन्द्रे आणि कृषी विद्यापीठाच्या सहकार्याने शेतक-यांची ज्ञान व अवलंबन पातळी वाढविण्यासाठी समूह माध्यमांद्वारे जागृती करावी. तसेच प्रशिक्षण व सामुहिक प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्याची शिफारस करण्यात येत आहे.

सौजन्‍य
संशोधन संचालनालय
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी