वनामकृवितील मृदविज्ञान विभाग अभिनव उपक्रम
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषी विद्यापीठातील मृदविज्ञान विभागाच्या
फिरती माती परीक्षण प्रयोगशाळेव्दारे
सेलु तालुक्यातील मौजे जवळा जिवाजी येथे दिनांक
३० मे रोजी माती परीक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सदरिल शिबीर मृदविज्ञान व कृषि रसायनशास्त्र
विभाग, बास्को ग्रामीण विकास केंद्र सेलु, जिवाजी महाराज बचत गट, जय हुनमान बचत गट, रमाबाई बचत गट,
श्री निवास बचत गट आदी महिला बचत गटाच्या
सहकार्याने राबविण्यात आले. शिबिरात परिसरातील ७० महिला शेतकरी भगीनींनी सहभाग नोंदवुन मातीचे नमुणे गोळा करुन माती परिक्षणासाठी सादर केले.
शिबिरात विभाग प्रमुख डॉ व्ही. डी. पाटील यांनी संतुलीत पीक पोषणासाठी माती परिक्षणाचे महत्व या विषयी मार्गदर्शन करून महीलांनी माती परिक्षण शिबीर घेण्याचा निर्णय घेऊन पुर्णत्वासनेल्या बददल महीलांचे कौतुक केले. मृदाशास्त्रज्ञ डॉ अनिल धमक यांनी माती परिक्षण अहवालानुसार खताच्या शिफारसीबाबत तर मृदाशास्त्रज्ञ डॉ पपिता गौरखेडे यांनी माती परिक्षण व पिक व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी सरपंच अशोक खरात, ज्योती सदाशीवराव समेळ, सिमा विजय वानरे आदीसह शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. शिबीराच्या यशस्वीतेसाठी डॉ. सदाशिव अडकीणे, शेख साजीद, पदव्युत्तर विद्यार्थी व गावातील ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले.