वनामकृवित क्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत दोन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन
राज्यातील
कृषि विभाग व कृषि विद्यापीठ
यांच्या संयुक्त विद्यमाने
कार्यरत असलेला क्रॉपसॅप
प्रकल्प हा एक आदर्श प्रकल्प
ठरला असुन राष्ट्रीय पातळीवरील
पुरस्कार प्राप्त झाले
आहेत.
प्रकल्पामुळे
गेल्या सात वर्षापासुन
मराठवाडयातील प्रमुख पिकांवरील
विविध कीड व रोगाच्या प्रादुर्भाव
वेळीच रोखण्यात मोठी मदत
झाली आहे,
असे
मत कुलगुरू मा.
डॉ.
बी.
व्यंकटेश्वरलु
यांनी व्यक्त केले.
वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील
कीटकशास्त्र विभाग व महाराष्ट्र
शासनाचे कृषि विभाग यांच्या
संयुक्त विद्यमाने सोयाबीन,
कापुस,
तुर
व हरभरा पिकावरील कीड-रोग
सर्वेक्षण व सल्ला (क्रॉपसॅप)
प्रकल्पांतर्गत
कृषि विभागातील अधिकारी,
कर्मचारी
व विद्यापीठातील जिल्हास्तरीय
समन्वयक यांचे दिनांक २९ व
३० जुन रोजी आयोजित दोन दिवसीय
प्रशिक्षण कार्यक्रमाच्या
उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
व्यासपीठावर
शिक्षण संचालक डॉ.
अशोक
ढवण,
विस्तार
शिक्षण संचालक डॉ.
बी.
बी.
भोसले,
कृषि
उपसंचालक डॉ.
रक्क्षा
शिंदे,
विभाग
प्रमुख डॉ.
पी.
आर.
झंवर
यांची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू
मा.
डॉ
बी व्यंकटेश्वरलु पुढे
म्हणाले की,
सदरिल
प्रकल्पामुळे कीड व रोग
व्यवस्थापनाबाबत शेतक-यांत
जागृती होऊन रासायनिक कीटकनाशक
व बुरशीनाशकांची अतिरिक्त
फवारणी टाळता येऊन पर्यावरणाचे
होणारे संभाव्य हानी टाळु
शकलो.
प्रकल्पाच्या
परिमाणाचे आर्थिक व पर्यावरणदृष्टया
संशोधनात्मक मुल्यांकन
होणे गरजेचे आहे.
यावर्षी
राज्यात चांगल्या पर्जन्यमानाचा
अंदाज असुन पिकांवरील विविध
कीड व रोगांचे व्यवस्थापन
केल्यास चांगले कृषी उत्पादन
येईल,
असे
मत त्यांनी यावेळी व्यक्त
केले.
शिक्षण
संचालक डॉ अशोक ढवण यांनी
आपल्या भाषणात प्रकल्पाचे
कार्य विस्तारत असुन प्रकल्पात
मागील अनुभवाच्या आधारे
योग्य ते बदल करावेत असे
सुचविले.
कीडींचा
संभाव्य धोका लक्षात घेऊन
प्रकल्पात कापसावरील गुलाबी
बोंडअळी व हुमणी कीडीचा नव्याने
समावेश केला असल्याचे विस्तार
शिक्षण संचालक डॉ.
बी.
बी.
भोसले
यांनी आपल्या भाषणात सांगितले
तर कृषि उपसंचालक डॉ.
रक्क्षा
शिंदे यांनी प्रकल्पात माहिती
तंत्रज्ञानाच्या वापरामुळे
गतिमानता प्राप्त झाल्याचे
आपल्या भाषणात सांगितले.
कार्यक्रमाचे
प्रास्ताविक डॉ पी आर झंवर
यांनी केले.
सुत्रसंचालन
डॉ ए जी बडगुजर यांनी तर आभार
प्रदर्शन डॉ.
डि
जी मोरे यांनी केले.
प्रशिक्षणाच्या
तांत्रिक सत्रात विद्यापीठ
शास्त्रज्ञांनी प्रशिक्षणार्थ्यींना
पिकांवरील विविध कीड व रोगाबाबत
मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास
कृषि विभागातील व विद्यापीठातील
अधिकारी व कर्मचारी मोठया
संख्येने उपस्थित होते.