माननीय कृषीमंत्री तथा
विद्यापीठाचे प्रतीकुलपती मा. ना. श्री. पांडुरंगजी फुंडकर यांनी वनामकृवितील एकुण
५६४३ स्नातकांना विविध पदवीने केले अनुग्रहीत
कृषिच्या विद्यार्थ्यानी
कृषि उद्योजक होऊन ग्रामीण भागात रोजगार निर्मीती केली पाहिजे......कुलपती मा.
प्रा. डॉ. पंजाब सिंग
आज कृषिच्या विद्यार्थ्यानी केवळ नौकरीसाठी शिक्षण
न घेता, एक कृषि उद्योजक होऊन ग्रामीण भागात रोजगार निर्माण केला पाहिजे.
मराठवाडयातील पारंपारिक शेतीचे विज्ञानधिष्ठीत शेतीत परिवर्तनासाठी कृषिच्या
विद्यार्थ्यीनी कार्य करावे. दर्जेदार शिक्षण, संशोधन व विस्तार कार्याच्या माध्यमातुन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने कृषि विकासासाठी सक्षम मनुष्यबळाची व
कृषी तंत्रज्ञानाची निर्मीतीचे भरिव कार्य केले आहे, असे प्रतिपादन झांसी येथील
राणी लक्ष्मीबाई कृषि विद्यापीठाचे कुलपती मा. प्रा. पंजाब सिंग यांनी केले. वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा एकविसावा दीक्षांत समारंभ दिनांक २५ मार्च रोजी संपन्न
झाला, यावेळी दीक्षांत अभिभाषण करतांना ते बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी
राज्याचे कृषीमंत्री तथा विद्यापीठाचे प्रतीकुलपती मा. ना. श्री. पांडुरंगजी
फुंडकर हे होते तर कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु, विद्यापीठ कार्यकारी
परिषदेचे सदस्य मा. आमदार डॉ राहुल पाटील, मा श्री केदार सोळुंके, मा. श्री.
गोविंदराव देशमुख, मा. श्री. राहुल सोनवणे, मा. श्री. अनंतराव चौदे, मा. श्री.
रविंद्र देशमुख, माजी कुलगुरू मा. डॉ एस एस कदम, शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, कुलसचिव
डॉ विलास पाटील, संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ
बी बी भोसले, उपकुलसचिव श्री एच एल भांगे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलपती मा. प्रा. पंजाब सिंग पुढे
म्हणाले की, सन १९६० पर्यत देशासमोर अपुरे अन्नधान्य ही मोठी समस्या होती, परंतु
शेतकरी, देशाचे कृषि धोरण व कृषि शास्त्रज्ञ यांच्या सहाय्याने आज आपण जगात भात,
गहु, दुध, फळ, मांस, अंडी व भाजीपाला पिकांत मुख्य उत्पादक देश आहोत. जागतिक
हवामान बदल, नैसगिक संकटे, जमिनीची धुप, पाण्याचे दुर्भिक्ष, शेतमाल भावातील
चढउतार, जमीन विखंडनीकरण, मजु-यांची समस्या, अजैविक ताण, तापमान वाढ, अन्नद्रव्याची
कमतरता आदी कारणामुळे सध्याचे वाढीव शेती उत्पादकतेत शाश्वतता राखणे कठिण होत
आहे. माहिती तंत्रज्ञान, नॅनो तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान आदी आधुनिक तंत्राचा
कृषि संशोधन वापर करावा लागेल. सार्वजनिक व खाजगी भागीदारी तत्वावर संशोधन व
विकासासाठी प्रयत्न करावा लागेल. देशाच्या कृषि विकासातील कृषि विद्यापीठे हे
महत्वाचे स्त्रोत असुन जागतिक व देशातील सामाजिक-आर्थिक प्रगतीच्या वेगासोबत
राहण्यासाठी कृषी विद्यापीठीय शैक्षणिक यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज आहे.
मराठवाडयातील शेती विकासासाठी पाणी व्यवस्थापन अत्यंत महत्वाचे असुन गाव
पातळीवर वॉटर बजेट संकल्पना राबवावी लागेल, पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीक पध्दतीत
बदल करावा लागेल. देशातील अल्प भुधारकांचा विचार करून प्रती एकरी जमीनीची उत्पादकता
वाढवावी लागेल. एकात्मिक पिक व्यवस्थापनाचा अवलंब करावा लागेल तसेच लहान
शेतजमिनीसाठी योग्य यांत्रिकीकरणाचा आधार घ्यावा लागेल. शेतक-यांनी एक पिक पध्दती
सोडुन पिक लागवडीत विविधता आणुन पशुपालन व कृषि संलग्न जोडधंदाचा आधार घ्यावा
लागेल, असे प्रतिपादन त्यांनी केले.
माननीय प्रति कुलपती मा. ना. श्री.
पांडुरंगजी फुंडकर यांनी स्नातकांना सत्याच्या मार्गावर राहुन देशाप्रती व
समाजाप्रती प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडण्याची शपथ देऊन विविध विद्याशाखेतील
एकुण ५६४३ स्नातकांना विविध पदवी, पदव्युत्तर व आचार्य पदवीने अनुग्रहीत केले.
प्रास्ताविकात कुलगुरू मा. डॉ.
बी. व्यंकटेश्वरलु म्हणाले की, शेतक-यांच्या स्थानिक गरजानुसार तंत्रज्ञान
निर्मीती हे विद्यापीठाचे मुख्य कार्य असुन विद्यापीठ स्थापनेपासुन कृषि विकासात
उच्च शिक्षण, संशोधन व विस्तार शिक्षणाच्या माध्यमातुन भरीव योगदान दिले आहे.
विद्यापीठ विकसित तुर, सोयाबीन व कापुस वाणास मराठवाडयातील शेतक-यांत मोठी मागणी
असुन इतर राज्यातही या खालील क्षेत्र वाढत आहे. आज विद्यापीठाचा एका
महाविद्यालयापासुन २१ घटक व २४ सलंग्न महाविद्यालयाचा वटवृक्ष झाला आहे. विद्यापीठातील
अनेक विद्यार्थ्यी विविध क्षेत्रात आपले मोलाचे योगदान देत आहे. शेतक-यांत उमेद
जागृतीसाठी विद्यापीठ प्रयत्न करित आहे, असे सांगुन त्यांनी विद्यापीठाच्या
कार्याची माहिती दिली.
सदरिल दीक्षांत समारंभात रांजणी (ता.
कळंब जि. उस्मानाबाद) येथील प्रगतशील शेतकरी तथा नॅचरल
शुगरचे संचालक मा. श्री. भैरवनाथ ठोंबरे यांना कृषिरत्न या मानद उपाधीने सन्मानित
करण्यात आले तर विद्यापीठ संशोधनात भरीव योगदानाबाबत डॉ के एस बेग, डॉ एस पी
मेहेत्र व डॉ डि जी मोरे यांना राधाकिशन शांती मल्होत्रा पोरितोषिकांनी गौरविण्यात
आले.
दीक्षांत समारंभात विद्यापीठातील
विविध अभ्यासक्रमासाठी विद्यापीठाने व दात्यांनी निश्चित केलेल्या सूवर्ण पदके,
रौप्य पदके व रोख पारितोषिके पात्र स्नातकांना प्रदान करून मान्यवरांच्या हस्ते
गौरविण्यात आले. याच यात आचार्य पदवीचे ४६ पात्र स्नातक, पदव्युत्तर पदवीचे ६६३
स्नातक व पदवी अभ्यासक्रमाचे ४९३४ स्नातकांचा समावेश होता. कार्यक्रमाचे
सुत्रसंचालन डॉ आशा आर्या व डॉ डि जी मोरे यांनी केले. समारंभास शहरातील प्रतिष्ठीत
व्यक्ती, प्रगतशील शेतकरी, विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यी
मोठया संख्येने उपस्थित होते.
दीक्षांत समारंभात दिव्या रवदा, बी. विभजम सगल
किरण, सनवर मल चौधरी, पल्लवी हिंगे, प्रिती रूपनर, सुर्यकांत तरटे, प्रशांत साहनी,
प्रणिल काळे, संगिता मेदी, आर्या पी., शिवेंदु सोलंकी, मंजिरी सोनोने, मृणाल
बारभाई, अंकित कुमार, सय्यद झुबेर सय्यद तुराब, प्रिया नवणे, मोनिका, जयश्री दुधभाते,
प्रतिभा ठोंबरे, स्नेहल कदम, रोहण देशपांडे आदीं स्नातक सुवर्ण पदकांनी
गौरविण्यात आले तर गौरी काकडे, चंद्रकांत सावंत, महेश जजोरिया, प्रसाद शिंदे, अंबिका चौधरी, स्नेहल
माद्रप आदीं स्नातकांना रोख पारितोषिकांनी गौरविण्यात आले.
प्रास्ताविक करतांना कुलगुरू
मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु
|