वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठातील गृहविज्ञान महाविद्यालयात दिनांक 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन व
टॅलेंट शोचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त विद्यार्थ्यासाठी महाविद्यालयात
वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, सुक्ष्मनिरीक्षण, स्मरण चाचणी, शब्द बांधणी,
बुध्दीबळ, कॅरम, न थांबता हसणे, समुह गायन, नृत्य, बॅडमिंटन, रीले रेस, व्हॉलीबॉल,
क्रिकेट आदी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेते तसेच
महाविद्यालयातील स्टुडंट ऑफ द इअर अर्वाडचे वितरण शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण व
प्राचार्या प्रा. विशाला पटणम यांच्या हस्ते करण्यात आले होते. पदवी अभ्यासक्रमाच्या
ऋतुजा घळे (प्रथम वर्ष), सानिया
मैराळ (व्दितीय वर्ष), रूची मुथा
(तृतीय वर्ष), अलका पोवळे (चतुर्थ वर्ष), पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या दिपाला
संगेकार (प्रथम वर्ष), टि अरूणा (व्दितीय वर्ष) यांना स्टुडंट ऑफ द इअर पारितोषिकांनी
सन्माननित करण्यात आले. कार्यक्रमात विद्यार्थ्यीनीनी क्लासिकल, मॉडर्न नृत्य
व अभिनय सादर केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आयोजन प्राचार्या प्रा. विशाला पटणम
यांच्या मार्गदर्शनाखाली जिमखाना उपाध्यक्षा डॉ सुनिता काळे यांच्या सह कर्मचारी
व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.