वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठातील विस्तार शिक्षण संचालनालय आणि इंडियन फार्रर्स फर्टिलाइझर को.
ऑपरेटिव्ह लिमिटेट (इफको) यांचे संयुक्त विदयमाने दि. 17 मार्च ते 19 मार्च दरम्यान
मराठवाडयातील शेतक-यांसाठी आधुनिक कृषि तंत्रज्ञानाबाबत तीन दिवसीय शेतकरी
प्रशिक्षण व प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले असुन सदरिल कार्यक्रमाचे उदघाटन
विस्तार शिक्षण संचालक डॉ डॉ. बी. बी. भोसले
यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी इफको (मुंबई)
चे विपणन मुख्य प्रबंधक श्री. एस. डी. वरुर, मुख्य विस्तार
शिक्षण अधिकारी डॉ. पी. आर. देशमुख, विस्तार शिक्षण अधिकारी प्रा पी. एस. चव्हाण,
इफको (औरंगाबाद) चे मुख्य विभागीय व्यवस्थापक
श्री. डी. डी. कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात विस्तार
शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले म्हणाले की, शेतक-यांनी विद्यापीठाने शिफारस
केलेल्या कमी खर्चाच्या तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. कपाशीत फरदड घेण्याचे टाळावे
तसेच पिकांची फेरपालटणी करावी. शेतीत कीड, रोग व तण व्यवस्थापणाच्या एकात्मिक
उपाय योजनाचा अवलंब करण्याचे केले. प्रास्ताविकेत श्री. डी. डी. कुलकर्णी यांनी
इफको शेतक-यांसाठी करत असलेल्या कार्याची माहिती दिली तर डॉ. पी. आर. देशमुख
यांनी विदयापीठाच्या विस्तार कार्याची माहिती दिली. परभणी जिल्हाचे इफकोचे प्रबंधक
श्री. कोटेचा यांनी आभार मानले. कार्यक्रमास शेतकरी बांधव मोठया संख्येने उपस्थित
होते.