Tuesday, March 7, 2017

कृषिच्‍या विद्यार्थ्‍यांनी व्‍यक्तिमत्‍व विकासावर भर देणे गरजेचे....कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु

वनामकृवित दिन दिवसीय व्‍यक्तिमत्‍व विकास कार्यशाळेचे उदघाटन


कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्‍यीनी अभ्‍यासक्रमातील तंत्रज्ञान कौशल्‍याबरोबरच संवाद कौशल्‍य अवगत करणेने गरजेचे आहे, आजच्‍या स्‍पर्धेच्‍या युगात व्‍यक्तिमत्‍व विकासावर भर द्यावा लागेल, असे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले. वसंतराव नाईक मराडवाडा कृषि विद्यापीठातील शिक्षण संचालनालयाच्‍या वतीने विद्यार्थ्‍यी व प्राध्‍यापकांसाठी दिनांक 7 ते 9 मार्च दरम्‍यान आयोजित दिन दिवसीय व्‍यक्तिमत्‍व विकास कार्यशाळेच्‍या उद्घाटना प्रसंगी ते बोलत होते. व्‍यासपीठावर बेंगलोर येथील स्‍मार्ट सीरीजच्‍या मुख्‍य प्रशिक्षीका श्रीमती एस राधा, शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, कुलसचिव डॉ व्‍ही डी पाटील, प्राचार्य डॉ डि एन गोखले, प्राचार्य डॉ ए एस कडाळे, प्राचार्य प्रा पी एन सत्‍वधर, प्राचार्या प्रा. विशाला पटणम आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, प्राध्‍यापकांनीही विद्यार्थ्‍यांना घडवितांना आजच्‍या काळातील गरज ओळखुन त्‍यांच्‍या व्‍यक्तिमत्‍वात बदल घडविण्‍याचा प्रयत्‍न करावा. स्‍मार्ट सीरीजच्‍या मुख्‍य प्रशिक्षीका श्रीमती एस राधा आपल्‍या भाषणात म्‍हणाल्‍या की, व्‍यक्तिमत्‍वाचा विकास ही एका दिवसात घडणारी बाब नसुन यासाठी व्‍यक्‍तीला निरंतर प्रयत्‍न करावे लागतात. आजच्‍या युगात संवाद कौशल्‍य व वेळेचे नियोजनाचे कौशल्‍य महत्‍वाचे आहे. खाजगी व कॉर्पोरेट क्षेत्रात नौकरी मिळविण्‍यासाठी संवाद कौशल्‍याची आवश्‍यकता असल्‍याचे प्रास्‍ताविकात मुख्‍य आयोजक शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. रणजित चव्‍हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. झाडे यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्‍यापक, अधिकारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.