वनामकृविच्या
कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात
‘व्यक्तिमत्व विकासाचे विविध पैलू’ वरील कार्यशाळेचे उद्घाटन
स्पर्धेच्या
युगात व्यक्तिमत्व विकासास अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले असुन व्यक्तिमत्व
विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, असे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलू
यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात ‘व्यक्तिमत्व विकासाचे विविध पैलू’ यावर
दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन दिनांक २२ व २३ मार्च रोजी करण्यात आले असुन उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून
विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण हे उपस्थित होते. व्यासपीठावर प्राचार्य
डॉ अशोक कडाळे, जिमखाना उपाध्यक्ष प्रा. राहुल
रामटेके, हैदरबाद येथील वक्ते डॉ. बी. शिवप्रसाद आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू
मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलू पुढे म्हणाले की, व्यक्तिमत्व विकासासाठी थोर
व्यक्तींची जीवनचरित्रे वाचली पाहिजेत. थोर व्यक्तींनी आपले जीवन कसे घडविले, त्यांनी केलेले कार्य आणि स्वतःचे जीवनमान कसे उंचावले यावरून आपण आपले व्यक्तिमत्व
सुधारू शकतो. आपल्या वागण्यातून आणि बोलण्यातून नेहमी सकारात्मक भाव दिसला पाहिजे, तसेच प्रत्येकाने चांगला श्रोता असणेही महत्वाचे आहे.
शिक्षण
संचालक डॉ. अशोक ढवण आपल्या भाषणात म्हणाले की, विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन अभ्यासक्रमासोबतच
स्वत:च्या व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. डॉ. बी. शिवप्रसाद यांनी
विविध व्हीडीओ क्लिप्स, पॉवरपॉईंट च्या माध्यमाव्दारे सादरिकरण
केले. समोरच्या व्यक्तिशी
संवाद साधताना, बोलताना बॉडिलॅंग्वेजवर भर द्या.
त्यातून तुम्ही प्रभावी संभाषण साधू शकता. आपले मुद्दे पटवून देऊ शकता, असे ही
त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे
प्रास्ताविक डॉ. अशोक कडाळे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मधुकर मोरे यांनी केले.
कार्यक्रमास प्रा. भास्करराव भुईभार, प्रा.
विवेकानंद भोसले, प्रा. पंडित मुंडे, प्रा रविंद्र शिंदे, प्रा. गोपाळ शिंदे, प्रा दत्तात्रय पाटील, प्रा. विशाल इंगळे, प्रा. संदीप पायाळ, प्रा. प्रमोदिनी मोरे, प्रा. संजय सुपेकर, प्रा. लक्ष्मिकांत
राऊतमारे आदीसह महाविद्यालयातील अधिकारी, कर्मचारी व सुमारे
२०० विद्यार्थी प्रशिक्षणार्थी उपस्थित आहेत.