कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात ‘व्यक्तिमत्व विकास आणि समुपदेशन’ यावरील एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
व्यक्तिमत्व विकास ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली
आहे, महाविद्यालयीन जीवनात वाटचाल करत असताना विद्यार्थ्यांचा सकारात्मक
दृष्टीकोन वाढीस लागला पाहिजे, असे मत अकोला येथील फडके
अकादमीचे संचालक श्री. सतीश फडके यांनी व्यक्त केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान
महाविद्यालयाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी जिमखाना विभागाच्या वतीने ‘व्यक्तिमत्व विकास आणि समुपदेशन’ या
एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन दिनांक 18 मार्च रोजी करण्यात आले होते, त्याप्रसंगी
ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठाचे नियंत्रक श्री. किशोर
गायकवाड हे उपस्थित होते, तर प्राचार्य डॉ अशोक कडाळे, जिमखाना उपाध्यक्ष प्रा.
राहुल रामटेके, वक्त्या अपर्णा जोशी आदींची प्रमुख उपस्थिती होती. विद्यापीठ
नियंत्रक श्री किशोर गायकवाड आपल्या
भाषणात म्हणाले की, जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन पदवी
अभ्यासक्रमासोबतच स्वत:च्या व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष दिले पाहिजे. व्यक्तिमत्व
विकास हे मानवी जीवनाचे मुख्य अंग असून त्यासाठी सदोदित प्रयत्न केले पाहिजे असे मत
प्राचार्य डॉ. अशोक कडाळे यांनी व्यक्त केले. यावेळी जिमखाना उपाध्यक्ष प्रा. राहुल रामटेके व वक्त्या अपर्णा जोशी यांनीही
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा मधुकर मोरे यांनी केले. सूत्रसंचालन देविका
बलखंडे हिने तर आभार प्रा. सुभाष विखे यांनी मानले. कार्यक्रमास डॉ. स्मिता खोडके, प्रा. स्मिता सोलंकी, प्रा. भास्करराव भुईभार, प्रा.
व्ही एम भोसले, प्रा रविंद्र शिंदे, प्रा.
गोपाळ शिंदे, प्रा दत्तात्रय पाटील, प्रा. पंडित मुंडे, प्रा. दयानंद टेकाळे, प्रा. विशाल
इंगळे, प्रा. संदीप पायाळ, प्रा.
प्रमोदिनी मोरे, प्रा गोपाळ शिंदे, प्रा.
लक्षिमिकांत राऊतमारे आदीसह महाविद्यालयातील इतर अधिकारी व विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.