वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील मृद
विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागात मध्यवर्ती उपकरण केंद्राचे विस्तारीकरण
करण्यात आले असुन दिनांक 20 जानेवारी रोजी सदरिल विस्तारीत कक्षाचे उदघाटन नवी
दिल्ली येथील भारतीय कृषि संशोधन परिषदेचे सहाय्यक महासंचालक डॉ एस के चौधरी
यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु,
शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, विभाग प्रमुख डॉ सय्यद ईस्माइल आदींची प्रमुख
उपस्थिती होती. विद्यापीठातील आचार्य पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना संशोधन
कार्यासाठी सदरिल उपकरण केंद्राचा मोठा उपयोग होणार आहे. मृद विज्ञान व कृषि
रसायनशास्त्र विभागातर्फे माती, पाणी, ऊती विषयक विविध घटकाचे रासायनिक पृथ: क्करण
करण्याची नियमित गरज भासते, त्या दृष्टीकोनातुन सदरिल कक्षाचा उपयोग होणार आहे.
तसेच शेतक-यांचे माती व पाणी नमुने तपासणीसाठीही याचा उपयोग होणार आहे.