वनामकृवितील
परभणी कृषि महाविद्यालयाचा रोजगार मार्गदर्शन व समुपदेशन कक्ष व स्पर्धा मंच
यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानात प्रतिपादन
वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाचा रोजगार मार्गदर्शन व
समुपदेशन कक्ष व वनामकृवि विद्यार्थ्यी स्पर्धामंच यांच्या संयुक्त विद्यमाने
दिनांक 27 मार्च रोजी ‘पिकांच्या वाणांचे पेटंट व
शेतक-यांचे हक्क संरक्षण’ याविषयावर पुणे येथील बौध्दिक
संपदा सल्लागार श्रीमती पल्लवी कदम यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले
होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु हे
होते तर शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, प्राचार्य डॉ डि एन गोखले आदींची व्यासपीठावर
प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शनात
श्रीमती पल्लवी कदम म्हणाल्या की, शेतक-यांचा वाण म्हणजे जो शेतक-यांचे
पुर्वापार पध्दतीने लागवड करून शोधला आहे किंवा शेतक-यांच्या शेतावर ज्याचा शोध
लागतो, अशा पिकांच्या वाणाची नोंदणी बौध्दिक स्वामित्व कायद्याव्दारे स्वत: पैदासकार
शेतकरी करून रॉयल्टी मिळवु शकतो. अध्यक्षीय भाषणात कुलगुरू मा. डॉ बी. व्यंकटेश्वरलु
म्हणाले की, कृषिच्या विद्यार्थ्यांनी बौध्दीक स्वामित्व कायद्याचा अभ्यास
करावा, या क्षेत्रात सल्लागार म्हणुन निश्चितच कॅरियर करू शकतील.
प्रास्ताविक
प्रा. आर व्ही चव्हाण यांनी तर सुत्रसंचालन प्रा. पी के वाघमारे यांनी केले, आभार
डॉ पी आर झंवर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्पर्धामंचाच्या सदस्यांनी
परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्यापक, कर्मचारी व पदव्युत्तर विद्यार्थ्यी
मोठया संख्येने उपस्थित होते.