वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्तार शिक्षण संचालनालयाच्या कृषि तंत्रज्ञान
माहीती केंद्र व हैद्राबाद
येथील राष्ट्रीय कृषि विस्तार व्यवस्थापन संस्था (मॅनेज) यांच्या वतीने माहिती
तंत्रज्ञानाच्या माध्यमातुन हवामान बदला आधारित कृषि सल्ला (नाईस प्लॅटफार्म) बाबत दोन
दिवसीय कार्यशाळा दिनांक 17 व 18 मे रोजी आयोजित करण्यात आली होती. सदरिल
कार्यशाळेचा समारोप विस्तार शिक्षण संचालक डॉ. पी. जी. इंगोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी कृषि विद्यावेत्ता डॉ. यु. एन.
आळसे, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. पी. आर. देशमुख, शास्त्रज्ञ श्री. जी.
भास्कर, श्री. हेमांशु
वर्मा आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय
भाषणात डॉ पी जी इंगोले यांनी नाईस प्लॅटफार्म माहिती तंत्रज्ञान यंत्रणेच्या माध्यमातुन शेतक-यांच्या
विविध कृषि विषयक समस्यांवर त्वरित उपाय मोबाईल संदेशाव्दारे सुचविणे शक्य
होणार असल्याचे सांगितले.
कार्यशाळेत मराठवाडयातील कृषि शास्त्रज्ञ, क्षेत्र सल्लागार आदींनी सहभाग घेतला.
माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातुन शेतक-यांच्या
समस्या सोडविण्यासाठीच्या नाईस या सुविधाचा वापर करून विद्यापीठ शास्त्रज्ञ अचुक संदेश
योग्य वेळी क्षेत्र सल्लागाराच्या माध्यमातुन शेतक-यांपर्यंत पोहोचवु शकणार
आहेत, या संपुर्ण प्रक्रियेबाबत कार्यशाळेत राष्ट्रीय कृषि विस्तार व्यवस्थापन
संस्थातील शास्त्रज्ञ श्री. जी. भास्कर, श्री. हेमांशु वर्मा आणि डॉ. पुनम प्रजापती यांनी प्रात्याक्षिकाव्दारे
माहीती दिली.
नाईस प्लॅटफार्मच्या
माध्यमातुन मोबाईल अॅप व्दारे शेतक-यांच्या कृषि तंत्रज्ञान विषयक समस्या त्वरीत
संदेशाव्दारे सोडविण्यात येऊ शकणार आहे. सदरिल यंत्रणा मराठवाडयात सद्यस्थितीत
काही निवडक गावात प्रायोगिकतत्वावर राबविण्यात येणार असुन पुढे या यंत्रणेची व्याप्ती
वाढविण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कृषि विद्यावेत्ता डॉ. यु. एन.
आळसे यांनी केले तर आभार मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. पी.आर. देशमुख यांनी
मानले.