भारतीय पोलीस सेवा, भारतीय लेखा
सेवा, भारतीय वन सेवा, भारतीय महसुल सेवा, भारतीय सेना मालमत्ता सेवा अशा विविध
भारतीय सेवेतील आंध्र प्रदेश, तामीळनाडू, कर्नाटक, केरळ आदी राज्यातील परिविक्षाधिन
अधिका-यांनी दिनांक 16 नोव्हेबर रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फत
विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालय, अन्नतंत्रज्ञान
महाविद्यालय, उती संवर्धन, कोरडवाहु संशोधन केंद्र आदी ठिकाणी भेटी देऊन माहिती
घेतले. यात नवीनकुमार एस, जी जवाहर, मोनिका देवागुड्डी, गुणांका डी बी, डी एन
हरीकिरण, सिमी मरियन जॉर्ज, एस जोन्स जस्टीन, संतोषकुमार जी, अफजल हमीद आदी
अधिका-यांचा समावेश होता.
विस्तार शिक्षण संचालक डॉ
प्रदिप इंगोले यांनी विद्यापीठाच्या कृषि विस्तार, संशोधन व शिक्षण कार्याबाबत माहिती
दिली. सौर उर्जा प्रकल्प व बैलचलित यंत्र यांची माहिती डॉ रामटेके व डॉ स्मिता
सोळंकी यांनी दिली तर अभियांत्रिकी महाविद्यालयाबाबत प्रा़चार्य डॉ यु एम खोडके व डॉ
डी डी टेकाळे यांनी माहिती दिली. विविध कृषि प्रक्रिया उद्योगाबाबत प्रा दिलीप
मोरे यांनी, पॉली हाऊस, शेडनेट, उती संवर्धनाबाबत डॉ के एम शर्मा यांनी तर कोरडवाहु
शेती संशोधनाबाबत डॉ मदन पेंडके यांनी माहिती दिली. कृषि हवामानशास्त्राबाबत प्रा
वाय ई कदम यांनी तर परभणी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री बी आर शिंदे यांनी कृषि
विभागाबाबत माहिती दिली. सदरिल भेटाचा कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्य विस्तार
शिक्षणाधिकारी डॉ पी आर देशमुख, कृषि विद्यावेत्ता डॉ यु एन आळसे, प्रा. पी एस चव्हाण,
कौसडीकर आदींनी परिश्रम घेतले.