Saturday, July 4, 2020

वनामकृविच्‍या वतीने शेतकरी महिलांसाठी डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शेतकरी महिलांची आत्‍मनिर्भरता यावर राज्यस्तरीय वेबिनार


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली आणि जागतिक बँक पुरस्‍कृत राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप), सेंटर ऑफ एक्सलन्स उत्पादकता वाढीकरता यंत्रमानव, ड्रोन आणि स्वयंचलित यंत्राद्वारे शेती प्रकल्पाच्‍या वतीने डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शेतकरी महिलांची आत्‍मनिर्भरता या विषयावर दि. 6 ते 10 जुलै दरम्‍यान राज्यस्तरीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. वेबीनारचे उदघाटन दिनांक 6 जुलै रोजी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या अध्‍यक्षतेखाली पार पडणार असून प्रमुख पाहुणे म्हणून पुणे येथील अटरी संस्‍थेचे  संचालक डॉ. लखनसिंग, पद्मश्री बीजमाता सौ. राही बाई पोपेरे, दौंड येथील अंबिका मसालेच्‍या  संचालिका सौ. कमलताई परदेशी आदी उपस्थित राहणार आहेत.
पाच दिवस चालणा-या वेबिनार मध्ये औरंगाबाद विभागीय कृषी सहसंचालक डॉ. दिनकर  जाधवप्राचार्या डॉ. जयश्री झेंड, एम.सी.इ.डी. औरंगाबाद चे माजी सहसंचालक श्री दीपक भिंगारदेव, मानसोपचार तज्ञ डॉ. साधना देशमुख, मुंबई हॉस्पिटलचे अली यावर जंग, बायफ पुणेचे श्री संजय पाटील, पुणे येथील कृषी आणि पाणी संवर्धन विभागाचे विभाग प्रमुख श्री प्रीतम वंजारी आदींचे मार्गदर्शन लाभनार आहे. तसेच समारोप कार्यक्रमास भारतीय कृषी अनुसंधान परिषदेतील नाहेप प्रकल्‍पाचे राष्ट्रीय संचालक डॉ. आर. सी. अग्रवाल, अभिनव फार्मर्स क्लब पुणेचे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर बोडके, सर्वोत्कृष्ट भारतीय महिला किसान पुरस्कार विजेत्या व ऑरगॅनिक फर्मिंग बारामतीच्या अध्यक्षा श्रीमती स्वाती शिंगाडे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
वेबिनार मध्ये शेतकरी महिलाना श्रम कमी करणाऱ्या, कमी किमतीच्या साधनांचा उपयोग विषयी, शेतकरी महिलांसाठी शासकीय योजनां, कृषि उद्योगाद्वारे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, मानसिक आरोग्याची काळजी, बीज शास्त्रोक्त संवर्धन पद्धतीडिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब, शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यामध्ये महिलांची भूमिका, महिलांची गटशेती व फायदे, महिलांसाठी कृषि आधारित गृहउद्योग आदी विषयावर अनुभवी व तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. अधिकाधिक महिलांच्या सहभागा करिता दुपारी 12.00 ते 3.00 दरम्यान हा वेबिनार असून यासाठी शेतकरी महिलांनी, युवतींनी  नोंदणी  करावी. प्रथम नोंदणी करणाऱ्या प्राधान्य असल्यामूळे नोंदणी करून या संधीचा लाभ घ्यावा.   जास्तीत जास्त 450 महिलांना झुम मीटिंग द्वारे लाभ घेता येईल. यू ट्यूब लिंक nahep-vnmkv-dfsrda द्वारे वेबिणार चा लाभ घेता येईल. वेबिनरचे आयोजन डॉ वीणा भालेराव, प्रमुख संशोधक डॉ गोपाळ शिंदे, डॉ गोदावरी पवार, डॉ मेघा जगताप आदीसह कोअर टीम मेंबर यांनी केले.