कृषि तंत्रज्ञान सप्ताह निमित्त मौजे समसापूर व मौजे धार येथे कार्यक्रम संपन्न
माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे प्रणेते स्व वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्र राज्यात दिनांक १ ते ७ जुलै दरम्यान कृषि तंत्रज्ञान सप्ताह राबविण्यात आला. यानिमित्त कृषि शास्त्रज्ञ व कृषी विस्तारक यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आधुनिक तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयातील सिंचन व निचरा अभियांत्रिकी विभागाच्या वतीने दि. ७ जुलै रोजी परभणी तालुक्यातील मौजे समसापूर व मौजे धार येथील शेतक-यांच्या प्रक्षेत्रास भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी प्राचार्य डॉ. उदय खोडके यांनी हळद
व कापूस पिकासाठी पाणी व्यवस्थापन या विषयावर प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करून सूक्ष्म
सिंचनाचे महत्व सांगितले. उत्पन्न वाढीकरिता सूक्ष्म सिंचन, आधुनिक व काटेकोर
शेती तंत्रज्ञानाची शेतकऱ्यांनी कास धरावी, असे आवाहन केले.
कार्यक्रमात ठिबक सिंचन संचाची देखभाल व
नियमित निगा कशी राखावी याबाबत विभाग प्रमुख डॉ. हरीश आवारी यांनी माहिती दिली. पाण्याचा
सामू मोजणे, अमला प्रक्रिया करणे यावर डॉ. सुमंत जाधव व डॉ. विशाल इंगळे यांनी प्रात्याक्षिका
व्दारे मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयातील डॉ. विखे, उध्दव ढगे, शेतकरी
श्री. विठ्ठलराव चोपडे, सुरेश ढगे, कैलाश चोपडे, शंकर ढगे, विलास ढगे, भानुदासराव
चोपडे, माऊली चोपडे, गोविंदराव चोपडे, भगवान चोपडे आदीसह इतर शेतकरी उपस्थित
होते.