वनामकृवित आयोजित राज्यस्तरिय पंधरा दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात प्रतिपादन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय
शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र,
पशुशक्तीचा योग्य वापर योजना, आणि
फार्म टु फोर्क सोल्युशन्स,
मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय
पंधरा दिवसीय ऑनलाईन सेंद्रीय शेती प्रशिक्षण कुलगुरु
मा. डॉ. अशोक ढवण व संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या
मार्गदर्शनाखाली दिनांक 21 सप्टेंबर
ते 9 ऑक्टोबर दरम्यान आयोजन
करण्यात आले आहे. प्रशिक्षण
कार्यक्रमाच्या तेराव्या दिवशी
दिनांक 5 ऑक्टोबर
रोजी “सेंद्रीय भाजीपाला व फळपिके लागवड तंत्रज्ञान” या विषयंावर व्याख्यानांचे
आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
भाजीपाला संशोधन योजनेचे संशोधन अधिकारी डॉ. विश्वनाथ
खंदारे, हे होते
प्रमुख व्याख्याते म्हणून राहूरी येथील
महात्मा फुले कृषि विद्यापीठातील ज्येष्ठ भाजीपाला पैदासकार डॉ. मधुकर भालेकर व बदनापूर येथील
मोसंबी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संजय
पाटील, नाशिक
येथील प्रगतशील शेतकरी श्री. ज्ञानेश्वर
रेवगडे,
श्री. कृष्णा
घाडगे,
मुख्य आयोजक प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे, पशुशक्तीचा योग्य वापर
योजने प्रभारी अधिकारी डॉ. स्मिता
सोलंकी,
डॉ. रणजीत
चव्हाण, आदींची
प्रमुख उपस्थिती होती .
अध्यक्षीय भाषणत डॉ. विश्वनाथ खंदारे म्हणाले की, आज सेंद्रीय भाजीपाला व फळ पिकांना वाढती मागणी आहे. यामुळे बाजारातील मागणी लक्षात घेऊन योग्य लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतक-यांनी सेंद्रीय भाजीपाला व फळपिकांची लागवड करावी. जेणे करून चांगले उत्पादन तसेच अधिक बाजारभाव मिळविता येईल. सेंद्रीय शेतीमध्ये संपुर्ण लागवड तंत्रज्ञान व सेंद्रीय बियाणे उत्पादन यावर लक्ष देणे आवश्यक आहे. शेतकरी बंधू भगिनी यांनी गटाच्या माध्यमातून सेंद्रीय बिजोत्पादन कार्यक्रम हाती घ्यावा जेणेकरून सेंद्रीय बियाण्यांची उपलब्धता वाढेल आणि बिजोत्पादनाच्या माध्यमातून आर्थिक फायदाही होईल.
प्रमुख वक्ते डॉ. मधुकर भालेकर आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की, सेंद्रीय भाजीपाला लागवड करतांना स्थानिक व देशी वाणांची निवड करण्यावर भर दयावा. तसेच योग्य वेळ, हवामान व योग्य हंगामामध्ये भाजीपाला पिकांची लागवड केल्यास भाजीपाल्यावर रोग, किडीचे प्रमाण कमी राहते. तसेच भाजीपाला पिकामध्ये किड व रोगांचे नियंत्रणासाठी लिंबोळी अर्क सारखे सेंद्रीय घटकाव्दारे प्रभावी नियंत्रण करता येते व मालाची गुणवत्ता टिकून राहते. भाजीपाला रोप निर्मिती करतांना नायलॉन कवर वापर केल्यास रसशोषणारे किडीपासून संरक्षण मिळते, पिकांची फेरपालट व विविध आंतर पिके व बॉर्डर पिके (मका व झेंडु) अशी पिके लावावीत जेणे करुन नैसार्गीक रित्या कीड व रोग नियंत्रणात आणता येतात असे सांगीतले.सेंद्रीय खतांचा (गांडुळखत, शेणखत इ.) उपयोग केल्यास भाजीपाल्याचे चव, रंग, स्वाद यामध्ये वृध्दी होते व भाजीपाला पिकांना चांगला भाव मिळतो असेही म्हणाले.
मार्गदर्शनात डॉ. संजय पाटील म्हणाले की, कोवीड-19 च्या काळामध्ये मोठ्या शहरांत व इतर बाजारपेठांमध्ये सेंद्रीय फळांना चांगली मागणी असून चांगला बाजारभाव मिळत आहे. रासायनिक घटकांपेक्षा सेंद्रीय घटकांचा विशेष प्रभाव गुणवत्तेवर होतांना दिसतो. यावेळी त्यांनी सेंद्रीय फळपिकांचे, लागवड तंत्रज्ञान, अन्नद्रव्य व्यवस्थापन, बाजारपेठ, सेंद्रीय प्रमाणीकरण यावर सविस्तर माहिती दिली.
प्रगतशील शेतकरी श्री. कृष्णा
घाडगे यांनी सांगीतले की, सेंद्रीय
शेतीत यशस्वीपणे काम करता येते. सेंद्रीय
शेतीसाठी आवश्यक निविष्ठा घरच्या घरी तयार केल्याने खर्च तर कमी होते तसेच
उत्पादनाची गुणवत्ता सुधारते. तसेच
चांगला बाजारभावही मिळतो. तर श्री. ज्ञानेश्वर रेवगडे यांनी
मनोगतात सेंद्रीय शेती करण्यासाठी प्रयत्न व सातत्य आवश्यक असून योग्य माहिती घेऊन
सेंद्रीय शेती केल्यास यश निश्चित मिळते
असे सांगितले.
प्रास्ताविक डॉ. आनंद गोरे यांनी केले तर सुत्रसंचलन डॉ. ज्योती गायकवाड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. सुनिल जावळे, श्री. श्रीधर पतंगे, श्री. सतीश कटारे व श्री. योगेश थोरवट आदींनी परिश्रम घेतले. प्रशिक्षण कार्यक्रमाचा राज्यातील शेतकरी बंधू भगिनी, विद्यार्थी, कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ, कृषि विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला.