वनामकृवित कृषी किटकशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित तुती रेशीम उद्योग प्रशिक्षणाचे उदघाटन
वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषी किटकशास्त्र विभाग
आणि रेशीम संशोधन योजना यांच्या सयुंक्त विद्यामाने भारतीय कृषी अनुसंधान परिषद पुरस्कृत कौशल्य
विकास
आधारित अनुसूचित जाती (उपयोजना) उपभोगाकरिता
तुती रेशीम उद्योग यावर तीन
दिवसीय प्रशिक्षनाचे आयोजन 17 ते
19 मार्च दरम्यान
करण्यात असुन प्रशिक्षणाचे
उदघाटन शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक
कृषी अधिकारी श्री संतोष आळसे, प्राचार्य डॉ सय्यद इस्माईल, विभाग
प्रमुख डॉ.संजीव बंटेवाड, रेशीम
संशोधन योजनेचे प्रभारी
अधिकारी डॉ
चंद्रकांत लटपटे आदींची प्रमुख
उपस्थिती होती.
मार्गदर्शनात डॉ
धर्मराज गोखले म्हणाले की, शेतीत शाश्वतता प्राप्त करण्याकरिता शेतकरी बांधवानी
शेतीपुरक जोडधंद्याची कास धरावी लागेल. रेशीमउद्योग हा
शेतकर्यांसाठी आर्थिकदृष्टया फायदेशीर असून सुशिक्षित तरुणांनी नोकरीच्या मागे न
लागता शेतीपुरक व्यवसाया करावा. तुती
रेशीम उद्योग, कुक्कुट पालन, मधमाशी पालन, शेळीपालन, डाळ मिल आदी शेतीपुरक
व्यवसायाचे प्रशिक्षण कार्यक्रम कृषि विद्यापीठाने सुरु करण्यात आलेले आहेत. प्रशिक्षणाचा
शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा असे डॉ. गोखले असे आवाहन त्यांनी केले.
श्री संतोष आळसे यांनी कृषि विभागा मार्फत सदरील उद्योगासाठी असलेल्या
विविध योजना व अनुदान यांची माहिती देऊन त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले तर मनोगतात
डॉ.
सय्यद इस्माईल म्हणाले की, बदलत्या
हवामान परिस्थितीत शेती पुरक जोडधंद्या शिवाय पर्याय नाही. याप्रसंगी मान्यवरांच्या
हस्ते रेशीम कोष निर्मीती आणि कोष काढणी तंत्रज्ञान या तांत्रिक पुस्तिकेचे विमोचन
करण्यात आले.
डॉ चंद्रकांत लटपटे यांनी रेशीम उद्योगाबाबत तांत्रिक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.संजीव बंटेवाड यांनी केले. सुत्रसंचालन डॉ.फारीया खान यांनी केले तर डॉ. श्रद्धा धुरगुडे यांनी आभार मानले. कार्यक्रमास विभागातील डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, डॉ. एम जी जाधव, डॉ. पुरुषोत्तम झंवर, डॉ सदाशिव गोसलवाड, डॉ धीरजकुमार कदम, डॉ. मिलिंद सोनकांबळे, डॉ. बसवराज भेदे, डॉ. अनंत लाड आदीसह प्रशिक्षणार्थी शेतकरी उपस्थित होते.