पिकामध्ये परागसिंचनात मधमाध्यांचे महत्वाचे स्थान ...... शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषी किटकशास्त्र विभागाच्या वतीने भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली अनुदानीत कौशल्य विकास आधारित अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत मधमाशी पालन या तीन दिवसीय प्रशिक्षनाचे २३ ते २५ दरम्यान आयोजित करण्यात असुन दिनांक 23 मार्च रोजी प्रशिक्षणाचे उदघाटन शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले यांच्या हस्ते झाले. उपविभागीय कृषी अधिकारी श्री. सागर खटकाळे, विभाग प्रमुख डॉ.संजीव बंटेवाड, डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शनात डॉ धर्मराज गोखले म्हणाले की, पिकामध्ये परागसिंचनासाठी किटकसृष्टीतील मधमाध्यांचे महत्वाचे स्थान असुन शेतक-यांनी शेतीपुरक जोडधंद्या म्हणुन मधमाशी पालन केल्यास आर्थिकदृष्टया फायदा होऊन मधमाश्यांमुळे पिक उत्पादनात वाढ होते. मधामध्ये औषधी गुणधर्मा असुन औषधी उद्योगात मोठी मागणी आहे.
उपविभागीय कृषी अधिकारी श्री. सागर खटकाळे यांनी कृषि विभागा मार्फत सदरील मधमाशी पालनासाठी असलेल्या विविध शासकीय योजना व अनुदान याची माहिती सांगितली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.संजीव बंटेवाड यांनी केले. सुत्रसंचालन डॉ.फारीया खान यांनी केले तर डॉ. श्रद्धा धुरगुडे यांनी आभार मानले. तांत्रिक सत्रात डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी परागसिंचनासाठी कीटकसृष्टीतील मधमाश्यांचे स्थान व मधमाशांच्या प्रजाती यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमास विभागातील डॉ. पुरुषोत्तम झंवर, डॉ धीरजकुमार कदम, डॉ. सदाशिव गोसलवाड, डॉ. मिलिंद सोनकांबळे, डॉ. बस्वराज भेदे, डॉ. अनंत लाड, डॉ. संजोग बोकन, डॉ. राजरतन खंदारे, श्री. दिपक लाड आदीसह प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.