अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्या हस्ते तुषार सिंचन संचाचे वाटप
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयीत सिंचन पाणी व्यवस्थापन संशोधन प्रकल्पाच्या वतीने अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत दिनांक १९ मार्च रोजी मौजे भोसा (ता मानवत जि परभणी) येथे शेतकरी मेळावा व तुषार सिंचन संच वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते तर संशोधन संचालक डॉ दत्त्प्रसाद वासकर, मानवत पंचायत समिती सदस्य श्री दत्तराव जाधव, सरपंच श्री सुभाषराव जाधव, उपसरपंच श्री महादेव जाधव, प्रकल्पाचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ अशोक कडाळे, कृषि विद्यावेत्ता डॉ गजानन गडदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्हणाले की, अनेक गावात पाण्याची मुबलकता असते, परंतु पाण्याचा काटेकोरपणे वापर करणे गरजेचे आहे. आधुनिक सिंचन पध्दती तुषार सिंचन व ठिंबक सिंचन पध्दतीचा वापर केल्यास पाण्याचे काटेकोरपणे वापर होऊन उत्पादन वाढ होते. विद्यापीठ विविध माध्यमातुन आधुनिक कृषी तंत्रज्ञान तळागाळातील शेतकरी बांधवापर्यंत पोहचविण्याकरिता प्रयत्नशिल असल्याचे ते म्हणाले.
संशोधक संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर म्हणाले की, उन्हाळयात जनावरांना चारा पिकांची कमतरता जाणवते, शेतकरी बांधवानी उन्हाळयातील चारा पिकांची लागवड करावी. विद्यापीठात विविध जातीचे चारापिकांची ठोंबे उपलब्ध असुन त्याचा वापर करावा.
प्रास्ताविकात
डॉ अशोक कडाळे यांनी तुषार सिंचन संचाचा कार्यक्षम वापर करण्यासाठी सिंचनाकरिता तुषार सिंचन
संचाचा सकाळी व संध्याकाळी वापर करण्याचा सल्ला दिला.
कार्यक्रमात
कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्या हस्ते मौजे भोसा येथील निवडक ६ अनुसूचित जातीच्या
महिला शेतकरी व शेतकरी बांधवांना तुषार सिंचन संचाचे वाटप करण्यात आले. तर सुत्रसंचालन डॉ गजानन
गडदे यांनी केले तर आभार श्री दत्तराव जाधव यांनी मानले. कार्यक्रमास गावातील शेतकरी बांधव व शेतकरी महिला उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी नंदकुमार गिराम, विलास जाधव, रत्नाकर पाटील, देवेंद्र कु-हा, बालु रणेर आदींनी परिश्रम घेतले.