वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत सामुदायिक विज्ञान महाविद्यालात दिनांक 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त महाविद्यालयातील मजूर महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात संगीत खुर्ची, प्रश्नमंजुषा आणि रांगोळी स्पर्धा यांचा समावेश होता. स्पर्धेत एकूण दहा मजूर महिलां सहभागी झाल्या होत्या. संगीत खुर्ची स्पर्धेत लक्ष्मीबाई गायकवाड तर प्रश्नमंजुषा स्पर्धेत आणि रांगोळी स्पर्धेत भारत (वर्षा) खोबे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. प्राचार्य डॉ. जयश्री झेंड आणि डॉ जया बंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ माधुरी कुलकर्णी, प्रा. मेधा उमरीकर, डॉ. शंकर पुरी, डॉ विद्यानंद मनवर आदींनी कार्याक्रमाचे नियोजन केले होते. स्पर्धा यशस्वीतेसाठी संगीता नाईक, शीतल मोरे, आलीम शेख, राम शिंदे आदींनी सहकार्य केले. स्पर्धे दरम्यान संपूर्णपणे कोविड नियमांचे पालन करण्यात आले होते.